• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, October 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

रेल्वेचा पाठपुरावा सूर्यराजेंचा, अन् ट्रॅकवर ‘सेल्फी’ फेसबुक पिंट्याचा! ‘बोरूबहाद्दरां’चे साहेबांना खुले आव्हान!

admin by admin
July 10, 2026
in गोफणगुंडा
Reading Time: 1 min read
रेल्वेचा पाठपुरावा सूर्यराजेंचा, अन् ट्रॅकवर ‘सेल्फी’ फेसबुक पिंट्याचा! ‘बोरूबहाद्दरां’चे साहेबांना खुले आव्हान!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नमस्कार वाचकहो! धाराशिवच्या राजकीय रंगमंचावर सध्या ‘क्रेडिट’ लाटण्याची एक मोठी सर्कस सुरू आहे. विषय आहे बहुचर्चित ‘धाराशिव-तुळजापूर -सोलापूर ‘ रेल्वे मार्गाचा. या मार्गावर आता वेगाने मातीकाम पूर्ण होऊन रुळ टाकण्याचे काम सुरू झाले आहे आणि २०२७ पर्यंत रेल्वे धावण्याची शक्यता आहे.

ही खऱ्या अर्थाने धाराशिवकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पण या बातमीपेक्षा जास्त चर्चा रंगलीये ती, या रेल्वेच्या ट्रॅकवर जाऊन उगीचच ‘सेल्फी’ काढणाऱ्या आणि खोटे श्रेय लाटणाऱ्या ‘फेसबुक पिंट्या उर्फ पावशेरसिंह’ यांच्या स्टंटबाजीची! आज ‘बोरूबहाद्दर’ या साहेबांच्या पोकळ दाव्यांची पुराव्यासकट पोलखोल करणार आहेत.

१. बोरूबहाद्दरांचे फेसबुक पिंट्याला खुले आव्हान!

गेली अनेक वर्षे धाराशिवचे नागरिक या रेल्वे मार्गासाठी मोर्चे काढत होते, आंदोलने करत होते. तेव्हा आमचे हे ‘फेसबुक पिंट्या‘ साहेब कुठे होते? साहेबांनी या आंदोलनांना कधी पाठिंबा दिला होता का? रेल्वेसाठी साहेबांनी एखादं साधं ‘स्टेटमेंट’ तरी दिलं होतं का? साहेब, जर तुम्ही खरंच काही केलं असेल, तर त्याचा एखादा पुरावा जनतेला द्या! हे आमचं तुम्हाला खुलं आव्हान आहे.

२. फ्लॅशबॅक: साहेबांचा राजकीय सोयीचा ‘रेल्वे प्रवास’

रेल्वेचं श्रेय लाटायला निघालेल्या साहेबांना जरा त्यांचा इतिहास आठवून देऊया:

  • २०१४ ची घोषणा आणि साहेबांची मांडलिकशाही: जेव्हा देशाच्या प्रमुखांनी (गुजराती बाबूंनी) या रेल्वेची घोषणा केली, तेव्हा धाराशिवचे खासदार होते ‘हवाई रवींद्र’. आणि आमचे फेसबुक पिंट्या साहेब त्यावेळी कुठे होते? तर ते ‘बारामतीच्या चंद्रराजांचे’ निष्ठावान मांडलिक म्हणून विरोधी पक्षात बसले होते!

  • २०१९ चा दणका आणि ‘गुजराती बाबूं’वर चिखलफेक: २०१९ मध्ये या रेल्वे मार्गाला बजेट मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला गती मिळाली. त्यावेळी खासदार म्हणून ‘सूर्यराजे’ निवडून आले होते. याच निवडणुकीत फेसबुक पिंट्या साहेब तोंडावर आपटले होते. विशेष म्हणजे, पराभूत होण्यापूर्वी साहेब याच ‘गुजराती बाबूं’वर यथेच्छ चिखलफेक करत होते (ज्याचे पुरावे आणि व्हिडिओ आजही यूट्यूबवर उपलब्ध आहेत!).

  • कमळाचा आधार आणि २०२४ चा महा-पराभव: लोकसभेत दारुण पराभव झाल्यावर याच साहेबांनी ‘गुजराती बाबूं’पुढे थेट शरणागती पत्करली आणि हातात कमळ धरलं. २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी स्वतःच्या बायकोला मैदानात उतरवलं, पण सूर्यराजेंनी तब्बल सव्वातीन लाखांच्या मताधिक्याने त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला!

३. सूर्यराजेंचा संसदेत लढा, अन् पिंट्याचे ‘बोगस’ पेजवर सेल्फी!

रेल्वेच्या कामाला खऱ्या अर्थाने गती कुणामुळे मिळाली? सूर्यराजेंनी सातत्याने लोकसभेत धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाबाबत प्रश्न उपस्थित करून, दिल्लीत मंत्र्यांचे उंबरठे झिजवून याचा पाठपुरावा केला.

आणि इकडे फेसबुक पिंट्या काय करत होते? तर रेल्वेच्या ट्रॅकवर जाऊन, इंजिनिअरसारखा पोझ देऊन फोटो काढायचे आणि ‘बोगस माझा’, ‘बोगस २.०’ अशा स्वतःच्याच पाळलेल्या ‘पेड (Paid)’ फेसबुक पेजेसवर “बघा मीच रेल्वे कशी आणली!” अशा बातम्या छापून आणायचे! दिल्लीत पाठपुरावा सूर्यराजेंचा आणि ट्रॅकवर सेल्फी पिंट्याचा, असा हा सगळा बोगस कारभार सुरू होता.

४. सूर्यराजे सत्तेत आल्यामुळे साहेबांची कोंडी!

आता राजकारणाचा गेम असा पलटलाय की, सूर्यराजे थेट सत्तेत आले आहेत. आता अधिकृत श्रेय सूर्यराजेंनाच मिळणार, हे स्पष्ट झाल्यामुळे फेसबुक पिंट्या साहेब प्रचंड चिंतेत पडले आहेत.

आता स्वतःच्या नावाची हवा करण्यासाठी साहेबांनी काही ‘दिव्य’ पत्रकारांना हाताशी धरले आहे. पाकिटे वाटून “मीच कसा पाठपुरावा करत आहे” अशा भासवणाऱ्या बातम्या ‘पेड न्यूज’ म्हणून प्रसिद्ध केल्या जात आहेत. पण साहेब, तुम्ही कितीही ‘दिव्य पत्रकारांना पाकिटे दिली आणि ‘बोगस’ पेजेसवर कितीही सेल्फी टाकले, तरी धाराशिवची जनता सगळं ओळखून आहे.

कारण, लक्षात ठेवा… “यह पब्लिक है, सब जाणती है!”

Previous Post

धाराशिवच्या 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाला गती; पहिल्या टप्प्यात ₹18.46 कोटींच्या निधीला मंजुरी

Next Post

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

Next Post
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

'हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?'

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

October 6, 2026

Recent Posts

  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
  • पवनचक्कीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भंगार खरेदीदारासह ६ जणांना अटक, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!