• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येळकोट , येळकोट जयघोषाने मैलारपूर नगरी दुमदुमली

श्री खंडोबाच्या पौष पौर्णिमा यात्रेस पाच लाख भाविकांची हजेरी

admin by admin
January 26, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
येळकोट , येळकोट जयघोषाने मैलारपूर नगरी दुमदुमली
0
SHARES
436
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा – बाणाई विवाहस्थळ असलेल्या श्री खंडोबाची पौषपौर्णिमा महायात्रा बुधवार आणि गुरुवारी पार पडली. या दोन दिवसांत किमान पाच लाख भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेऊन , भंडारा (हळद ) – खोबरे यांची मुक्तपणे उधळण केली, त्यामुळे सर्व भाविक सोन्याच्या रंगाने न्हाऊन निघाले होते.येळकोट, येळकोट जय मल्हार जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

बुधवारी दुपारी चार वाजल्यापासून धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील नंदीध्वज (काठ्या ) येण्यास सुरुवात झाली. गुरुवार दुपारपर्यंत जवळपास सातशे नंदीध्वज ( काठी ) चे यात्रास्थळी आगमन झाले, किमान 50 ते 100 वारू आणि भाविक काठीला आकर्षक सजावट करून, हलगी, सनई, तुतारीच्या निनादात काठी नाचवत मंदिर प्रदक्षिणा करून, नेहमीच्या ठिकाणी मुक्काम केला,अनेक ठिकाणी वाघ्या आणि मुरळीच्या नृत्यावर खंडोबाची गाणी सुरू होती.

दोन दिवस दर्शनासाठी लांबच लांब रांग लागली होती, किमान सहा तास दर्शनासाठी लागत होते, लातूर जिल्ह्यातील वरवंटी येथील खोबरे बंधूनी यात्रेत मोफत अन्नदान करून, किमान 50 स्वयंसेवकांनी मंदिरात दोन दिवस पोलिसांप्रमाणे सेवा बजावली . खोबरे बंधुमुळे पोलिसानवरील ताण मागील दोन वर्षांपासून कमी झाला आहे.

गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास अणदूर आणि नळदुर्गच्या मानाच्या काठ्यांचे आगमन झाले, यावेळी आकाशात रंगीबेरंगी शोभेचे दारूकाम करण्यात आले, जय मल्हार या अक्षरने भाविकांचे डोळ्याचे पारणे फेडले. अणदूर खंडोबा मंदिरातील दोन अश्व आणि मानाची काठी येताच, वातावरण भक्तिरसात चिंब झाले होते.

पहाटे तीनच्या सुमारास अणदूर आणि नळदुर्गच्या मानकऱ्यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला, त्यानंतर छबिना मिरवणुकीस प्रारंभ झाला, मसोबा, जुने मंदिर अशी प्रदक्षिणा करून शुक्रवारी सकाळी छबिना मिरवणुकीची सांगता झाली.

यंदा धाराशिव जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने बोरी धरणात पाणीसाठा झाला नाही, तरीहि भाविकांसाठी कॅनॉलला पाणी सोडण्यात आले, तसेच नळदुर्ग नगर परिषदच्या वतीने जवळपास 15 ते 20 टँकर दोन दिवस पाणीपुरवठा करीत होते, मंदिर समितीने पाच ठिकाणी बोअर घेऊन 24 तास पाणीपुरवठा केला , त्यामुळे दुष्काळाची तीव्रता जाणवली नाही.

यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी श्री खंडोबा मंदिर समिती, नळदुर्ग नगर परिषद, अणदूर आणि नळदुर्ग यात्रा कमिटी, दोन्ही गावाचे मानकरी आणि समाजसेवक यांनी परिश्रम घेतले. नळदुर्ग पोलिस स्टेशनच्या पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

 

 

Previous Post

अखेर विजय दंडनाईक यांची शरणागती

Next Post

येरमाळ्यात हॉटेलची उधारी मागण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

येरमाळ्यात हॉटेलची उधारी मागण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी, तीन जखमी

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; घरफोडी, दुचाकीसह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास

April 14, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

भाविकांना रुम विचारल्याच्या रागातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; जातीवाचक शिवीगाळप्रकरणी ५ जणांवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा

April 14, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव : घरभाड्याच्या वादातून घरमालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

April 14, 2026
घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धेची फसवणूक; तुळजापुरात ६० हजारांचे सोन्याचे गंठण लंपास

April 14, 2026
धाराशिव: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर चोराखळी येथील ‘महाकाली कला केंद्रा’ला टाळे

धाराशिव: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर चोराखळी येथील ‘महाकाली कला केंद्रा’ला टाळे

April 14, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group