• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, August 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आंबी : गाडीला कट मारल्याच्या रागातून तरुणावर कोयता आणि रॉडने जीवघेणा हल्ला;

सोन्याची साखळीही ओरबाडली, पाच जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
March 8, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
596
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा: गाडीला कट मारल्याच्या कारणावरून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर लोखंडी कोयता, रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोनारी (ता. परंडा) येथील रेस्ट हाऊस चौकात घडली. या मारहाणीदरम्यान हल्लेखोरांनी एकाची सोन्याची साखळी देखील हिसकावून नेली. याप्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात पाच जणांवर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवी परमेश्वर मांडवे (वय ३७, रा. सोनारी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत शिंदे, बाळू शिंदे (दोघे रा. साकत, ता. परंडा) आणि त्यांचे इतर तीन अनोळखी साथीदार अशा एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास रवी मांडवे हे सोनारी येथील रेस्ट हाऊस चौकात असताना हा प्रकार घडला. गाडीला कट मारल्याच्या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून रवी यांच्याशी वाद घातला. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सोबत आणलेल्या लोखंडी रॉड, लोखंडी कोयता आणि लाकडी दांडक्याने रवी यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याच मारहाणीच्या झटापटीत आरोपींनी तिथे असलेले बिभीषण हांगे यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीने ओढून नेली.

या थरारक घटनेनंतर जखमी रवी मांडवे यांनी शनिवारी (दि. ७ मार्च) आंबी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या प्रथम खबरेवरून पोलिसांनी प्रशांत शिंदे, बाळू शिंदे आणि इतर तिघांवर कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, ११९(१), १८९(१), १९०, १९१(२), १९१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. भरचौकात झालेल्या या राडेबाजीमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, आंबी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Previous Post

शेतातील रस्त्याच्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; आवारपिंपरी येथील घटना, तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

अनधिकृत बांधकामाचा जाब विचारल्याने तरुणावर सिमेंटच्या विटेने हल्ला; कदमवाडी येथील घटना, एकावर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

अनधिकृत बांधकामाचा जाब विचारल्याने तरुणावर सिमेंटच्या विटेने हल्ला; कदमवाडी येथील घटना, एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (पार्ट २): ‘बिनविरोध’च्या नाटकामागील शकुनीमामा आणि देवाभाऊंची ‘तिसरी नजर’!

August 2, 2026
धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात तीन मोटारसायकली चोरीला; तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील अचलेर तांड्यावर तुफान राडा! सोलापूरच्या तरुणाला दगड अन् बाभळीच्या काटेरी झुडपाने मारहाण

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथे जोरदार राडा! तिघांना लाकडाने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

August 2, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!