धाराशिव – शहरातील आनंदनगर पोलीस स्टेशनचे वादग्रस्त आणि भ्रष्ट पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांची बीडला उचलबांगडी झाल्यानंतर आता या जागेवर बाळासाहेब पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन पोलीस निरीक्षक पवार शहरातील अवैध धंदे बंद करणार की बांगर यांच्याप्रमाणे मलिदा लाटणार , हे लवकरच कळणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील जवळपास १४ जणांच्या जिल्हा बाहेर बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आलेल्या पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांना पोलीस स्टेशन वाटून देण्यात आले आहे,. त्यात क्रीम पोस्टिंग मिळावी म्हणून अनेकांनी विविध मार्ग अवलंब केल्याची चर्चा आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये हे आहेत १४ नवे कारभारी