• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, June 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

विठ्ठलवाडीत संतापजनक प्रकार: किरकोळ वादातून हरभरा पिकाला लावली आग, ७० हजारांचे नुकसान

admin by admin
March 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
347
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी: विनाकारण किरकोळ वाद उकरून काढून एका शेतकऱ्याच्या शेतातील हरभऱ्याच्या पिकाला आग लावल्याची संतापजनक घटना धाराशिव तालुक्यातील विठ्ठलवाडी शिवारात उघडकीस आली आहे. या आगीत शेतकऱ्याचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध श्रीरंग कसपटे (वय ३२, रा. विठ्ठलवाडी, ता. जि. धाराशिव) यांच्या मालकीचे विठ्ठलवाडी शिवारात शेत आहे. ६ मार्च रोजी रात्री पावणेदहा ते ७ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. गावातीलच अमोल आबार आणि जगताप या दोघांनी अनिरुद्ध यांच्यासोबत विनाकारण किरकोळ कारणावरून वाद घातला आणि भांडण केले. याच वादाचा राग मनात धरून या आरोपींनी अनिरुद्ध कसपटे यांच्या शेतातील हरभऱ्याच्या पिकाला आग लावली.

या आगीत हरभरा जळून खाक झाला असून, यात फिर्यादीचे अंदाजे ७० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर अनिरुद्ध कसपटे यांनी १४ मार्च रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या या प्रथम खबरेवरून अमोल आबार आणि जगताप (दोघेही रा. विठ्ठलवाडी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२६ (एफ) आणि ३२४ (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.


Previous Post

गोवर्धनवाडीत शेतात जाण्याच्या कारणावरून सशस्त्र हल्ला; तलवार आणि कोयत्याने वार, ५ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिवमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेली सव्वा लाखांची जनावरे जप्त; एकावर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिवमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेली सव्वा लाखांची जनावरे जप्त; एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

मुरुम पोलिसांची मोठी कारवाई! अचलेर तांड्यात विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्याला रंगेहात पकडले; गावठी कट्टा जप्त

June 14, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी चाललेली जनावरांची बेकायदेशीर वाहतूक येरमाळा पोलिसांकडून उघड; २ जर्सी गायींसह ४ वासरांची सुटका

June 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

चालत्या आयशर टॅम्पोमधून खाद्यतेलाचे बॉक्स लंपास; चोरांनी केले हजारो रुपयांचे नुकसान, येरमाळा पोलिसांत गुन्हा

June 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

खडकी शिवारात राडा! शेतातील मुरुम नेण्यास विरोध केल्याने वृद्धाला बेदम मारहाण , १४ जणांवर गुन्हा दाखल

June 14, 2026
घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

भावाने पकडून दिले, पोलिसांनी पोलीस ठाण्यातून सोडून दिले!

June 14, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group