• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

जिल्ह्यातील ८ गुन्हे उघडकीस; पावणेचार लाखांच्या ७५० किलो ॲल्युमिनियम तारा जप्त

admin by admin
March 18, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव :  धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीच्या ॲल्युमिनियम तारा चोरी करणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला मोठे यश आले आहे. पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या ७५० किलो वजनाच्या ॲल्युमिनियम तारा जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील पवनचक्की चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.

मालमत्तेविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांचे पथक मंगळवारी (ता. १७ मार्च) गस्तीवर होते. यावेळी त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, बालाजी ऊर्फ आवड्या अजिनाथ शिंदे (वय २४) आणि शहाजी भीमराव शिंदे (वय ३२, दोघे रा. मांडवा, जि. धाराशिव) यांच्याकडे पवनचक्कीतून चोरी केलेल्या ॲल्युमिनियमच्या तारा असून, तो मुद्देमाल त्यांनी लपवून ठेवला आहे. या माहितीवरून पोलिसांनी तातडीने सापळा रचून दोन्ही संशयितांना मुद्देमालासह शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी तुळजापूर आणि वाशी तालुक्यातील नळदुर्ग, चिवरी, मानेवाडी, जिन्नर आणि दहिफळ शिवारातील पवनचक्कीच्या खांबांवरून या तारा चोरल्याची कबुली दिली. धाराशिव जिल्ह्याचा गुन्हे अभिलेख तपासला असता अशा प्रकारच्या चोरीचे एकूण ८ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा तात्काळ पंचनामा करून त्यांच्याकडून पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत या दोन आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांची नावे आणि चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या सर्व आरोपींनी मिळून हे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. अटकेतील आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी वाशी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोलिस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, महिला पोलिस हवालदार शोभा बांगर, पोलिस नाईक अशोक ढगारे, पोलिस शिपाई योगेश कोळी, चालक नागनाथ गुरव आणि रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली.


Previous Post

चुकीच्या ‘स्कॅनर’वर गेलेले दीड लाख रुपये महिलेला मिळाले परत!

Next Post

शासकीय कामात अडथळा; पवनचक्कीच्या कामगारांना मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शासकीय कामात अडथळा; पवनचक्कीच्या कामगारांना मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

दुष्काळी पाहणी की फार्स?

दुष्काळी पाहणी की फार्स?

September 23, 2026
“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

September 23, 2026
धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

September 23, 2026
धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026

Recent Posts

  • दुष्काळी पाहणी की फार्स?
  • “त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात
  • धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर
  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!