• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘तक्रार मागे घेण्यासाठी १० लाख दे’, तरुणाला दुचाकीची धडक देऊन झाडाला बांधून बेदम मारहाण; भूममधील सोनगिरी येथील धक्कादायक प्रकार

admin by admin
March 27, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
753
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम: “तुझ्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी आम्हाला १० लाख रुपये दे,” अशी मागणी करत एका २४ वर्षीय तरुणाला दुचाकीची जोराची धडक देऊन, फरफटत नेत झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना भूम तालुक्यातील सोनगिरी येथे घडली आहे. ‘कोर्टाच्या तारखेला कसा हजर राहतो तेच बघतो’ अशी जीवे मारण्याची धमकीही या तरुणाला देण्यात आली आहे. याप्रकरणी भूम पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील पाच जणांसह एकूण सहा जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल नवनाथ मारकड (वय २४ वर्षे, रा. सोनगिरी, ता. भूम, जि. धाराशिव) असे या मारहाणीत जखमी झालेल्या आणि फिर्याद दिलेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवार, दि. २६ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अतुल हा सोनगिरी शिवारातील कुटे वस्तीकडे जाणाऱ्या पुलाजवळून जात होता.

यावेळी आरोपी विठ्ठल कसबे, पांडुरंग कसबे, लक्ष्मी कसबे, गजराबाई कसबे, रामहरी कसबे आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती (सर्व रा. सोनगिरी, ता. भूम) यांनी त्याला गाठले. “तुझ्या विरोधात दिलेली तक्रार आम्ही मागे घेतो, त्याबदल्यात तू आम्हाला १० लाख रुपये दे” अशी मागणी आरोपींनी केली. यावरून आरोपींनी त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलने अतुलच्या गाडीला जोराची धडक दिली. त्यानंतर त्याला काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जखमी केले.

एवढ्यावरच न थांबता आरोपींनी अतुलला फरफटत नेऊन एका झाडाला बांधून ठेवले आणि ‘तू कोर्टातील तारखेला कसा हजर राहतोस, तेच बघतो’, असे म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या जीवघेण्या हल्ल्यातून कशीबशी सुटका झाल्यानंतर अतुल मारकड यांनी गुरुवारी (दि. २६) भूम पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या खळबळजनक फिर्यादीवरून पोलिसांनी विठ्ठल कसबे, पांडुरंग कसबे, लक्ष्मी कसबे, गजराबाई कसबे, रामहरी कसबे आणि इतर एकावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(४), १२७, ११८(१), ११५(२), ३५१(३), १८९(२), १९० आणि १९१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे भूम तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


Previous Post

आई आजारी असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; परंडा पोलिसांत ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

Next Post

‘ऑर्डर घ्यायला किती वेळ लागणार?’ विचारल्याचा राग; कळंबमध्ये ग्राहकांवर चाकू आणि बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

'ऑर्डर घ्यायला किती वेळ लागणार?' विचारल्याचा राग; कळंबमध्ये ग्राहकांवर चाकू आणि बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात ‘उपोषणाचा अर्ज’ दिल्याच्या रागातून घरावार जीवघेणा हल्ला!

July 11, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब तालुक्यात सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! हावरगाव शिवारात लिंबाच्या झाडाला घेतला गळफास; कोल्हे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 11, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

July 10, 2026
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

July 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group