• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, May 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शाळा एकत्रीकरण केल्यास शाळेला टाळे ठोकू!

 बेंबळी येथील जि.प. कन्या शाळेच्या संतप्त पालकांचा प्रशासनाला इशारा

admin by admin
March 30, 2026
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!
0
SHARES
450
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेचे सहशिक्षण (Co-education) शाळेत रूपांतर करण्याच्या निर्णयास गावकरी आणि पालकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. “शाळा एकत्रीकरण केल्यास शाळेला थेट टाळे ठोकू,” असा कडक इशारा सर्व पालकांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या ९ फेब्रुवारी २०२६ च्या पत्राचा संदर्भ देत, बेंबळी येथील जि. प. कन्या प्राथमिक शाळेचे रूपांतरण सहशिक्षणाच्या शाळेत (मुले-मुली एकत्र) करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, या निर्णयाला बेंबळी गावातील शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व पालकांनी कडाडून विरोध केला आहे. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालकांनी आज (दि. ३० मार्च) जिल्हाधिकाऱ्यांकडे एक लेखी निवेदन सुपूर्द केले.

पालकांनी निवेदनात मांडलेले प्रमुख आक्षेप:

शाळा एकत्रीकरणाच्या निर्णयामुळे मुलींच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम होईल अशी भीती पालकांनी व्यक्त केली असून खालील मुद्दे मांडले आहेत:

१) शाळेचे एकत्रीकरण केल्यास गावात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी होईल.

२) शासनाचे ‘मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढविण्याचे’ जे मूळ उद्दिष्ट आहे, ते या निर्णयामुळे पूर्ण होणार नाही.

३) शाळा एकत्र केल्यास विद्यार्थ्यांची आणि विशेषतः विद्यार्थिनींची मोठी अडचण निर्माण होईल.

प्रशासनाला कडक इशारा:

गावातील सर्व पालक आणि ग्रामस्थांची अशी ठाम मागणी आहे की, बेंबळी येथील कन्या शाळा पूर्वीप्रमाणेच स्वतंत्र सुरू ठेवावी. प्रशासनाने या मागणीची दखल न घेता बळजबरीने शाळा एकत्रीकरण केल्यास शाळेला टाळे ठोकण्यात येईल. तसेच, यामुळे विद्यार्थ्यांचे जे काही शैक्षणिक नुकसान होईल, त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनावर उद्धव देडेकर, संतोष आणासाहेब, राजकुमार परदेशी, राधिका सय्यद, कोमल रसाळ, जयश्री लेंडवे यांच्यासह गावातील अनेक संतप्त पालकांच्या आणि ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता यावर जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून आहे.

Previous Post

“तनाने शिवसेनेत, मनाने भाजपात…” शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Next Post

मुरुम-लातूर महामार्गावर ‘फिल्मी स्टाईल’ लूटमार; इनोव्हातून आलेल्या सहा जणांनी सव्वा लाखांची रोकड पळवली

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

मुरुम-लातूर महामार्गावर ‘फिल्मी स्टाईल’ लूटमार; इनोव्हातून आलेल्या सहा जणांनी सव्वा लाखांची रोकड पळवली

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

रांजणीत सालगड्यानेच केला विश्वासघात; मालकाचे सव्वाचार लाख रुपये घेऊन पोबारा

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मळगीवाडीत शेतातील माती टाकण्याच्या वादातून वृद्धेला बेदम मारहाण

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘हॉर्न का वाजवला?’ म्हणत दाम्पत्याला लुटले; उमरगा चौरस्त्यावरील धक्कादायक घटना

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला; बोंबले चौकातील घटनेने खळबळ, एकावर गुन्हा दाखल

May 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरग्यात ‘वंचित’च्या कार्यालयात घुसून पदाधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; शहरात खळबळ

May 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group