• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 28, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“तनाने शिवसेनेत, मनाने भाजपात…” शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

माजी जिल्हाप्रमुखाचा विद्यमान प्रमुखाला टोला!

admin by admin
March 29, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
“तनाने शिवसेनेत, मनाने भाजपात…” शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शिवसेना (शिंदे गट) पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि नेत्यांमधील धुसफूस आता थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चव्हाट्यावर येऊ लागली आहे. शिंदे सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे आपल्याच पक्षातील विद्यमान पदाधिकाऱ्यावर जोरदार टीका केली आहे. “तनाने शिवसेनेत, मनाने भाजपात…” अशा आशयाची अत्यंत खोचक पोस्ट साळुंखे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, हा टोला विद्यमान प्रभारी जिल्हाप्रमुखांना लगावला असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

नेमकी पोस्ट काय?

सध्या सोशल मीडियावर सुरज साळुंखे यांची एक फेसबुक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “तनाने शिवसेनेत मनाने भाजपात कळंबचा दलाल कुबड्या”.

या मोजक्याच पण आक्रमक शब्दांमधून त्यांनी नाव न घेता आपल्या राजकीय विरोधकावर निशाणा साधला आहे. या पोस्टमध्ये वापरण्यात आलेला ‘कळंबचा दलाल’ हा शब्दप्रयोग पाहता, त्यांचा थेट रोख कुणाकडे आहे, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

वादाची पार्श्वभूमी:

सुरज साळुंखे आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांमधील या वादाला गेल्या काही महिन्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षात मोठे खांदेपालट करण्यात आले होते. त्यावेळी सुरज साळुंखे यांना अचानक जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आले होते. त्यांच्या जागी कळंबचे अजित पिंगळे यांची प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

साळुंखे यांना पदावरून दूर करून पिंगळे यांच्याकडे जिल्ह्याची धुरा दिल्यापासूनच या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वर्चस्वावरून मोठा वाद (कोल्ड वॉर) सुरू आहे.

शिंदे गटात ‘ऑल इज नॉट वेल’

पदावरून हटवल्याची सल आणि स्थानिक पातळीवरील गटबाजी यातूनच साळुंखे यांनी ही पोस्ट करत आपला संताप व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. सत्ताधारी पक्षातीलच दोन प्रमुख नेत्यांमधील हा वाद असा चव्हाट्यावर आल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या फेसबुक पोस्टमुळे धाराशिव जिल्ह्यातील शिंदे सेनेत सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, आता या उघड वादाची पक्षश्रेष्ठी काय दखल घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

घाटपिंपरी ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या ४० लाखांच्या निधीचा अपहार; सरपंच आणि अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post

शाळा एकत्रीकरण केल्यास शाळेला टाळे ठोकू!

Next Post
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

शाळा एकत्रीकरण केल्यास शाळेला टाळे ठोकू!

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय

August 28, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

तुळजापूर : माउली पान शॉपच्या बाजूला पोलिसांचा छापा; २४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 28, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

सावरगाव : बोअरवेलचे पाणी घेण्याच्या वादातून पती-पत्नीला लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण; तिघांवर तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

August 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

उमरगा : बेडरूमच्या खिडकीचे गज कापून घरात शिरले चोरटे; तब्बल २२ तोळे सोनं अन् रोख रकमेसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल लंपास

August 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भिकार सारोळा : घराचे कुलूप तोडून मध्यरात्री २० हजारांचा ऐवज लंपास; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

August 28, 2026

Recent Posts

  • धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय
  • तुळजापूर : माउली पान शॉपच्या बाजूला पोलिसांचा छापा; २४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • सावरगाव : बोअरवेलचे पाणी घेण्याच्या वादातून पती-पत्नीला लोखंडी रॉड व काठीने बेदम मारहाण; तिघांवर तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
  • उमरगा : बेडरूमच्या खिडकीचे गज कापून घरात शिरले चोरटे; तब्बल २२ तोळे सोनं अन् रोख रकमेसह साडेदहा लाखांचा मुद्देमाल लंपास
  • भिकार सारोळा : घराचे कुलूप तोडून मध्यरात्री २० हजारांचा ऐवज लंपास; ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!