• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 31, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सुनेला भेटायला येत असल्याचे सांगितल्याच्या रागातून वाशीत तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला

हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप; एकावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

admin by admin
March 31, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
776
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी  : ‘तू गल्लीत येऊन सुनेला भेटतोस’, असे दुसऱ्या व्यक्तीला का सांगितलेस, याचा राग मनात धरून एका ३० वर्षीय तरुणावर तलवारीने सपासप वार करत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाशी (जि. धाराशिव) शहरात रविवारी (ता. २९) रात्री घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात एकावर हत्येचा प्रयत्न केल्याचा आणि शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय अच्युतराव क्षीरसागर (रा. साठेनगर, वाशी, ता. वाशी, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर, बाजीराव नानासाहेब जगताप (वय ३०, रा. शिंदे हॉस्पिटलच्या पाठीमागे, वाशी) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय क्षीरसागर हा गल्लीत येऊन त्यांच्या सुनेला भेटतो, अशी माहिती फिर्यादी बाजीराव जगताप यांनी महादेव क्षीरसागर यांना दिली होती. हीच बाब आरोपी विजय क्षीरसागर याला समजली आणि त्याला याचा राग आला. याच रागातून रविवारी (ता. २९) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास आरोपी विजयने बाजीराव जगताप यांना गाठले.

‘तू तसे का सांगितलेस’, अशी विचारणा करत आरोपीने सुरुवातीला बाजीराव यांना अर्वाच्य शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याने सोबत आणलेल्या तलवारीने बाजीराव यांच्यावर वार केले. या प्राणघातक हल्ल्यात बाजीराव जगताप हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, आरोपीने त्यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकीही दिली.

या थरारक घटनेनंतर बाजीराव जगताप यांनी सोमवारी (ता. ३०) वाशी पोलिस ठाण्यात जाऊन सविस्तर फिर्याद दिली. या प्रथम खबरीवरून पोलिसांनी आरोपी विजय क्षीरसागर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १०९, ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि भारतीय हत्यार कायदा (शस्त्र अधिनियम) कलम ४, २५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वाशी पोलिस करत आहेत. वाशी शहरात तलवारीने हल्ला झाल्याच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Previous Post

तुळजापूर तालुक्यात संतापजनक प्रकार: खाद्यात विष कालवल्याने तीन दुभत्या गायींचा मृत्यू

Next Post

शेतरस्त्याच्या वादातून टाकळी (बें) येथे राडा; आजोबा, वडील आणि नातवाला बेदम मारहाण

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतरस्त्याच्या वादातून टाकळी (बें) येथे राडा; आजोबा, वडील आणि नातवाला बेदम मारहाण

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब-येरमाळा रोडवरील हॉटेल फोडले; लॅपटॉप, धान्यासह एक लाखाचा मुद्देमाल लंपास

March 31, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतरस्त्याच्या वादातून टाकळी (बें) येथे राडा; आजोबा, वडील आणि नातवाला बेदम मारहाण

March 31, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

सुनेला भेटायला येत असल्याचे सांगितल्याच्या रागातून वाशीत तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला

March 31, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापूर तालुक्यात संतापजनक प्रकार: खाद्यात विष कालवल्याने तीन दुभत्या गायींचा मृत्यू

March 31, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वाघोलीत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धक्काबुक्की; कार्यालयाला ठोकले कुलूप

March 31, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group