• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, May 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात अन्नदान करणाऱ्या पुणेकर भाविकांना बेदम मारहाण; दागिने व रोकड लुटली

अपंग महिलेलाही सोडले नाही; चार अज्ञातांवर तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
April 3, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
1.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : येथील घाटशीळ पार्किंगजवळील १०८ भक्त निवास येथे भाविकांना जेवण वाढत असताना पुण्यातून आलेल्या सेवेकऱ्यांना चार अज्ञात व्यक्तींनी लोखंडी पाईप आणि भांड्यांनी बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. २) सायंकाळी घडली. अज्ञातांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात एका अपंग महिलेलाही मारहाण करण्यात आली असून, आरोपींनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी व ५ हजारांची रोकड लुटून नेली आहे.

याप्रकरणी शुभम बजरंग लांडे (वय २२, रा. पीएमटी कॉलनी शेजारी, गॅस गोडाऊनजवळ, श्री समर्थ नगर, लेन नं. ८, बिबवेवाडी, पुणे) यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम लांडे हे त्यांच्यासोबत असलेल्या ऐश्वर्या सोजवळ, सरोजा पांढरे, पायल लांडे, आरती भोसले आणि श्रद्धा भोंगळे (अपंग महिला) यांच्यासह तुळजापूर येथे आले होते. गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घाटशीळ पार्किंगजवळील १०८ भक्त निवास येथील हॉल नंबर ४ मध्ये व हॉलसमोर हे सर्वजण जेवण वाढण्याचे काम करत होते.

याचवेळी तिथे चार अज्ञात इसम आले. त्यांनी अचानक या सर्वांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच हातातील लोखंडी पाईप, पाण्याचे जार आणि स्टीलच्या भांड्यांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केली. या हल्ल्यात श्रद्धा भोंगळे या अपंग महिलेलाही आरोपींनी सोडले नाही. या गोंधळादरम्यान, आरोपींनी सरोजा पांढरे यांच्या गळ्यातील ३ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. तसेच तिथे उपस्थित असलेले सोहेब तांबोळी यांच्या शर्टच्या खिशातील ५ हजार रुपयांची रोख रक्कम जबरीने काढून घेतली आणि घटनास्थळावरून पोबारा केला.

या भयंकर प्रकारानंतर शुभम लांडे यांनी तातडीने तुळजापूर पोलिस ठाणे गाठून प्रथम खबर दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी चार अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९ (६), ७४ सह अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम कलम ९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दर्शनासाठी आलेल्या आणि अन्नदान करणाऱ्या भाविकांवर झालेल्या या हल्ल्यामुळे तुळजापुरात खळबळ उडाली असून, भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तुळजापूर पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अज्ञात आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

Previous Post

येरमाळा यात्रेत जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; तिघांवर गुन्हे दाखल

Next Post

तुळजाभवानी मंदिरात महिला चोरट्यांचा सुळसुळाट; सोलापूरच्या भाविक वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लांबवले

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजाभवानी मंदिरात महिला चोरट्यांचा सुळसुळाट; सोलापूरच्या भाविक वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लांबवले

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

रांजणीत सालगड्यानेच केला विश्वासघात; मालकाचे सव्वाचार लाख रुपये घेऊन पोबारा

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मळगीवाडीत शेतातील माती टाकण्याच्या वादातून वृद्धेला बेदम मारहाण

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘हॉर्न का वाजवला?’ म्हणत दाम्पत्याला लुटले; उमरगा चौरस्त्यावरील धक्कादायक घटना

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला; बोंबले चौकातील घटनेने खळबळ, एकावर गुन्हा दाखल

May 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरग्यात ‘वंचित’च्या कार्यालयात घुसून पदाधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; शहरात खळबळ

May 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group