• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, July 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘टीव्ही बंदी’च्या रंजक आवाहनापेक्षा शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधा; ठाकरे गटाचा झेडपी अध्यक्षांना टोला

admin by admin
April 4, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
‘टीव्ही बंदी’च्या रंजक आवाहनापेक्षा शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधा; ठाकरे गटाचा झेडपी अध्यक्षांना टोला
0
SHARES
316
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ‘रात्री ७ ते ९ टीव्ही बंद’ ठेवण्याचे केलेले आवाहन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या आवाहनावर सडकून टीका केली असून, “टीव्ही बंदीच्या रंजक गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा प्रशासनाने ग्रामीण शाळांमध्ये मुलींसाठी सुरक्षित आणि बंधिस्त स्वच्छतागृहे बांधण्यावर लक्ष केंद्रित करावे,” असा खणखणीत सल्ला शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ता जगदीश पाटील यांनी दिला आहे.

या संदर्भात काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. टीव्ही पाहणे हा प्रत्येक कुटुंबाचा वैयक्तिक विषय असून सध्या विद्यार्थ्यांचा ओढा टीव्हीपेक्षा मोबाईलकडे जास्त आहे. त्यामुळे झेडपी अध्यक्षांचे हे आवाहन अवैज्ञानिक आणि मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करणारे असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

शाळांची अवस्था चिंताजनक; प्रशासनाला विचारले खडे सवाल

जिल्ह्यातील ग्रामीण शाळांमध्ये आजही पिण्याचे स्वच्छ पाणी नाही, शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलींसाठी सुरक्षित स्वच्छतागृहे नाहीत, या वास्तवाकडे शिवसेनेने लक्ष वेधले आहे. प्रशासनाला धारेवर धरताना त्यांनी खालील प्रश्न उपस्थित केले आहेत:

  • ‘पिंक रूम’ आणि मुलींची सुरक्षितता: ठाणे जिल्हा परिषदेने मुलींसाठी ‘पिंक रूम’ योजना राबवली, तशी धाराशिवमध्ये किती शाळांत राबवली? किती ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन आणि इन्सिनरेटर आहेत? आणि प्रशासनाकडे मुलींच्या शाळा गळतीचा (Dropout Rate) काही डेटा आहे का?

  • अतिवृष्टीग्रस्त १३७ शाळांचे काय? अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तब्बल १३७ शाळांचे नुकसान झाले आहे. छत गळती, पडक्या भिंती आणि वाहून गेलेली स्वच्छतागृहे अशा परिस्थितीत मुलींच्या सुविधांचे काय झाले? दुरुस्तीची कामे अद्याप का सुरू नाहीत?

  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता: शाळांमध्ये स्वच्छता सुविधा नसणे हे शिक्षणाच्या हक्काचे (कलम २१अ) थेट उल्लंघन असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. धाराशिव जिल्हा परिषदेने या आदेशाची दखल कधी घेतली आणि काय कार्यवाही केली? असा सवाल विचारण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील शाळांच्या स्वच्छतागृहांची सखोल पाहणी करून अहवाल सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या प्रमुख मागण्या:

१. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत मुलींसाठी खाजगीपणा जपणारी, पाणी आणि विजेची सोय असलेली स्वतंत्र व बंधिस्त स्वच्छतागृहे त्वरित बांधण्यात यावीत.

२. सध्या अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहांची देखभाल, साफसफाई व पाणीपुरवठ्यासाठी नियमित यंत्रणा कार्यान्वित करावी.

३. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या १३७ शाळांमधील स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती करावी.

४. या सर्व उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेने आगामी पाच वर्षांची सुस्पष्ट कृती योजना (Action Plan) जनतेसमोर जाहीर करावी.

“जिल्हा परिषदेने अशक्य अशी शैक्षणिक आव्हाने देण्यापूर्वी मूलभूत प्रश्न सोडवावेत, तरच जनता त्यांच्या आवाहनाला गांभीर्याने घेईल,” असा इशाराही जगदीश पाटील यांनी या पत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.

Previous Post

भररस्त्यात दुचाकीला लाथ मारून दाम्पत्याला पाडले; मारहाण करत सोन्याचे दागिने व मोबाईलसह ४५ हजारांचा मुद्देमाल लुटला

Next Post

“माझा परिवार, सत्ता परिवार!” मल्हार पाटील तुम्ही स्वतःच्या घरावर कोणता झेंडा लावणार?

Next Post
“माझा परिवार, सत्ता परिवार!” मल्हार पाटील तुम्ही स्वतःच्या घरावर कोणता झेंडा लावणार?

"माझा परिवार, सत्ता परिवार!" मल्हार पाटील तुम्ही स्वतःच्या घरावर कोणता झेंडा लावणार?

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

July 12, 2026
पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

July 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात ‘उपोषणाचा अर्ज’ दिल्याच्या रागातून घरावार जीवघेणा हल्ला!

July 11, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब तालुक्यात सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! हावरगाव शिवारात लिंबाच्या झाडाला घेतला गळफास; कोल्हे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group