• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, July 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“माझा परिवार, सत्ता परिवार!” मल्हार पाटील तुम्ही स्वतःच्या घरावर कोणता झेंडा लावणार?

शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा युवा समन्वयक ॲड. संजय भोरे यांचा सणसणीत टोला

admin by admin
April 5, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
“माझा परिवार, सत्ता परिवार!” मल्हार पाटील तुम्ही स्वतःच्या घरावर कोणता झेंडा लावणार?
0
SHARES
510
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – भाजपचे आमदार राणा पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी उद्या ६ एप्रिल २०२६ रोजी  भाजप स्थापना दिनानिमित्त ‘माझा परिवार, भाजपा परिवार’ असे म्हणत कार्यकर्त्यांना आपापल्या घरावर भाजपचा झेंडा लावण्याचे आवाहन करणारी एक पोस्ट केली आहे. मात्र, या आवाहनावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार पलटवार केला असून, ठाकरे गटाचे जिल्हा युवा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी मल्हार पाटील यांना बोचरा सवाल विचारला आहे.

“तुमच्या घरावर कोणता झेंडा?”

मल्हार पाटील यांच्या पोस्टरबाजीचा समाचार घेताना ॲड. संजय भोरे म्हणाले, “सोमवार, ६ एप्रिल रोजी भाजपा परिवारातील सदस्यांना घरावर भाजपचा ध्वज लावण्याचे आवाहन तुम्ही केले हे खरे; पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरावर कोणता झेंडा लावणार? तुमच्या घरावर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा की भाजपचा झेंडा असणार? कदाचित ‘माझा परिवार’ म्हणजे ‘तिन्ही झेंड्यांचा परिवार’ असे तर नाही ना?” असा उपहासात्मक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

“राजीनामा आणि प्रवेशाचा इव्हेंट कुठे गेला?”

पुढे बोलताना ॲड. भोरे यांनी पाटील कुटुंबीयांच्या राजकीय वाटचालीवर निशाणा साधला. ते म्हणाले, “ज्यांना प्रत्येक गोष्टीचा ‘इव्हेंट’ करण्याची उपजत सवय आहे, कारण डॉ. पद्मसिंह पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा आणि अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाचा राजीनामा दिल्याचे कुठेही अदयाप प्रसिद्ध झालेले नाही., म्हणून हे सहज आठवले.

कार्यकर्त्यांची अवस्था: ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?’

नेत्यांच्या या सोयीस्कर पक्षबदलामुळे आणि गोंधळामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांची मात्र मोठी अडचण झाली आहे. यावर मार्मिक भाष्य करताना ॲड. भोरे म्हणाले की, “या ‘सत्ता परिवाराच्या’ राजकारणामुळे कार्यकर्त्यांसाठी आज फक्त एकच गाणे प्ले करावेसे वाटत आहे आणि ते म्हणजे… ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती?’“

मल्हार पाटील यांच्या या आवाहनावर ॲड. संजय भोरे यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता राजकीय वर्तुळात ‘माझा परिवार की सत्ता परिवार?’ यावरून चांगलीच चर्चा रंगली आहे.


Previous Post

‘टीव्ही बंदी’च्या रंजक आवाहनापेक्षा शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधा; ठाकरे गटाचा झेडपी अध्यक्षांना टोला

Next Post

येरमाळ्यात पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; शासकीय कामात अडथळा, सात जणांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

येरमाळ्यात पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; शासकीय कामात अडथळा, सात जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

July 12, 2026
पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

July 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात ‘उपोषणाचा अर्ज’ दिल्याच्या रागातून घरावार जीवघेणा हल्ला!

July 11, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब तालुक्यात सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! हावरगाव शिवारात लिंबाच्या झाडाला घेतला गळफास; कोल्हे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group