• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष; धाराशिवमध्ये एकाला साडेत्रेसष्ट लाखांचा गंडा

admin by admin
April 7, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: ट्रेडिंगमध्ये मोठी गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका सायबर भामट्याने शहरातील एकाची तब्बल ६३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी धाराशिवच्या सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील समर्थनगर येथे राहणारे सुशीलकुमार शिवाजीराव सर्डे (वय ४५) यांची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. २० जानेवारी २०२६ रोजी सर्डे यांना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून एक लिंक आली होती. त्यानंतर सायबर भामट्याने त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू केले.

‘ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास मोठा फायदा होईल आणि जादा परतावा मिळेल,’ असे सांगून या भामट्याने सर्डे यांचा विश्वास संपादन केला. जादा पैशांच्या आमिषाला बळी पडून सर्डे यांनी गुंतवणुकीस होकार दिला. त्यानंतर २० जानेवारी ते ९ मार्च २०२६ या दीड महिन्यांच्या कालावधीत भामट्याने सर्डे यांना विविध कारणे सांगून टप्प्याटप्प्याने तब्बल ६३ लाख ५० हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले.

पैसे भरूनही कोणताही परतावा न मिळाल्याने आणि समोरून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे सर्डे यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी थेट सायबर पोलिस ठाणे गाठले.

सुशीलकुमार सर्डे यांनी सोमवारी (ता. ६ एप्रिल) दिलेल्या फिर्यादीवरून, सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४) सह माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम २००० च्या कलम ६६(सी) आणि ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस करत आहेत. नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

बेरडवाडीत हादरवणारी घटना: पतीने केली पत्नी आणि ८ वर्षीय चिमुकलीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या

Next Post

१० ग्रॅम सोन्याचे आमिष भोवले; तुळजापुरात बनावट सोने देऊन महिलेला गंडा

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

१० ग्रॅम सोन्याचे आमिष भोवले; तुळजापुरात बनावट सोने देऊन महिलेला गंडा

ताज्या बातम्या

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

October 18, 2026
‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

October 18, 2026
हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

October 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
  • ‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!
  • हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा
  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!