• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, October 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

रुग्णांच्या जिवाशी खेळणारा बोगस डॉक्टर उघडकीस; धाराशिवमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल

admin by admin
April 8, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
रुग्णांच्या जिवाशी खेळणारा बोगस डॉक्टर उघडकीस; धाराशिवमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : ‘महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन’ची कोणतीही अधिकृत मान्यता नसताना, बेकायदेशीररीत्या दवाखाना थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका बोगस डॉक्टरवर धाराशिव शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णांची आणि शासनाची फसवणूक केल्याचा ठपका या कथित डॉक्टरवर ठेवण्यात आला आहे.

डॉ. देवाशिष दास (बंगाली, रा. गणेशनगर, धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील देशपांडे स्टँड परिसरातील नेहरू चौक येथे या डॉक्टरने आपला बोगस दवाखाना सुरू केला होता. दिनांक २९ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आरोपी डॉ. दास याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली ‘महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन’ या संस्थेची कोणतीही मान्यता किंवा नोंदणी नव्हती. असे असतानाही तो गैरमार्गाने वैद्यकीय व्यवसाय चालवत होता. यातून त्याने शासन तसेच उपचारासाठी येणाऱ्या निष्पाप रुग्णांची मोठी फसवणूक केली असून, चुकीच्या औषधोपचारांमुळे रुग्णांच्या जिवितास धोका निर्माण केल्याचे समोर आले आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेत, धाराशिव उपजिल्हा रुग्णालयाचे शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. उन्मेष संतराम सेलुकर (वय ४६) यांनी स्वतः धाराशिव शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ७) फिर्याद दिली.

डॉ. सेलुकर यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात आरोपी डॉ. देवाशिष दास याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३१८(४), ३१९(२), २७९, १२५ तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम कलम ३३, ३३(१), ३३(२)(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाल्याने वैद्यकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

येडेश्वरी देवीच्या पालखी बंदोबस्तात पोलिसांना धक्काबुक्की; खांदेकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना: वाशीत पवनचक्कीच्या तारा, तर उमरग्यात दुचाकी पळविली

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना: वाशीत पवनचक्कीच्या तारा, तर उमरग्यात दुचाकी पळविली

ताज्या बातम्या

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

October 18, 2026
‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

October 18, 2026
हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

October 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
  • ‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!
  • हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा
  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!