नळदुर्ग : मयत नामे- सदाशिव ज्योतीराम जाधव, वय 83 वर्षे, रा. अणदुर, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि. 14.01.2024 रोजी 10.00 वा. सु. खंडोबा मंदीरात दर्शनाला जात असताना एनएच 65 हायवे रोड पायी क्रॉस करुन अणदुर कडे जात होते.दरम्यान बुलेट क्र एमएच 13 डी.एक्स 6085 चा चालक नामे सतिश संतोष मदगुंडी रा. व्यंकटेश्वर नगर ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांने त्याचे ताब्यातील बुलेट ही हायगई व निष्काळजीपणे चालवून सदाशिव जाधव यांना धडक दिली. या अपघातात सदाशिव जाधव हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी फिर्यादी नामे- सुधामती सदाशिव जाधव, वय 68 वर्षे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.31.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह मोवाका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : मयत नामे-अंबाजी लिंबाजी गिरी, वय 20 वर्षे, रा. वरवंटी ता. आंबेजोगाई जि. बीड हे उसाचे ट्रकमध्ये क्लिनर म्हणुन कंचेश्वर कारखाना मंगरुळ येथे उस वाहतुक करीत असताना धाराशिव ते तुळजापूर रोडवरील बोरी शिवारातील तुळजाभवानी हॉटेल समोर दि.21.01.2024 रोजी 20.30 वा. सु. ट्रक उभा करुन हॉटेलमध्ये चहा पिवून रस्ता क्रॉस करुन ट्रक कडे जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजीपणे चालवून अंबाजी गिरी यास साईडने धडक दिली. या अपघातात अंबाजी गिरी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा चुलता फिर्यादी नामे- भारत बाबु गिरी, वय 38 वर्षे, रा. वरवंटी ता. आंबेजागाई जि. बीड यांनी दि.31.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) सह मोवाका कलम 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.