• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चोरीच्या संशयावरून जमावाकडून बेदम मारहाण; एकाचा मृत्यू, निलेगाव येथील १६ जणांवर खुनासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

admin by admin
April 12, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग :  गावात चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरून जमावाने दोघांना काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे घडली आहे. या अमानुष मारहाणीत एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुसरा तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात १६ जणांविरोधात खुनासह अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन चंदर काळे (रा. पारधी वस्ती, तुळजापूर खुर्द, जि. धाराशिव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर सागर जयराम भोसले हे या मारहाणीत जखमी झाले आहेत. शुक्रवारी (ता. ३ एप्रिल) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निलेगाव येथील मारुती मंदिरासमोर हा प्रकार घडला.

आरोपी पिंकी शैलेश शिंदे, विकी शिंदे आणि राहुल शिंदे यांनी बबन काळे आणि सागर भोसले या दोघांना पकडून ठेवले. ‘हे दोघे गावात चोरी करण्यासाठी आले आहेत’, असे सांगून त्यांनी गावातील लोकांना बोलावून घेतले. यानंतर जमावाने एकत्र येत बबन काळे आणि सागर भोसले यांना काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत बबन काळे हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मयत बबन यांचे चिरंजीव राहुल बबन काळे (वय २१, रा. पारधी वस्ती, तुळजापूर खुर्द) यांनी शनिवारी (ता. ११ एप्रिल) नळदुर्ग पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

राहुल काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी मोहसीन वजोद्दीन इनामदार, पापा वजोद्दीन इनामदार, शंकर ऊर्फ श्रीधर जमादार, विठ्ठल महादेव घंटे, प्रकाश दशरथ जमादार, धनेश्वर प्रकाश जमादार, आदित्य प्रकाश जमादार, सचिन मारुती जमादार, पवन हनमंत जमादार, दादा बस्वराज जमादार, नितीन मारुती जमादार, समर्थ रमेश जमादार, रमेश अर्जुन जमादार, पिंकी शैलेश शिंदे, विकी शैलेश शिंदे आणि राहुल शैलेश शिंदे (सर्व रा. निलेगाव , ता. तुळजापूर) या १६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(२), ११८(१), ११५(२), १८९, १९०, १९१ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायदा कलम ३(२)(v) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलिस करत आहेत.

Previous Post

जमीन खरेदीच्या बहाण्याने तब्बल २ कोटी २० लाखांची फसवणूक; येरमाळा पोलिसांत ८ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

पवनचक्कीवर दरोड्याचा प्रयत्न; सुरक्षारक्षकावर दगडफेक, एकाला शस्त्रांसह पकडले

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पवनचक्कीवर दरोड्याचा प्रयत्न; सुरक्षारक्षकावर दगडफेक, एकाला शस्त्रांसह पकडले

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026
शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
  • कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल
  • हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!