• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पवनचक्कीवर दरोड्याचा प्रयत्न; सुरक्षारक्षकावर दगडफेक, एकाला शस्त्रांसह पकडले

वाशी पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल; गोलेगाव शिवारातील घटना

admin by admin
April 12, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी :  गोलेगाव (ता. वाशी) शिवारातील पवनचक्की प्रकल्पावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या टोळीने गस्तीवर असलेल्या सुरक्षारक्षकावर दगडफेक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पळून जाणाऱ्या एका आरोपीला तलवार आणि लोखंडी कत्तीसह पकडण्यात यश आले असून, त्याचे तीन साथीदार पळून गेले आहेत. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध दरोड्याच्या पूर्वतयारीचा आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशी तालुक्यातील गोलेगाव शिवारात असलेल्या पवनचक्की क्रमांक डब्ल्यू.एस.एच ०१ (W.S.H 01) येथे शुक्रवारी (ता. १० एप्रिल) पहाटे ३ ते पावणेपाच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. साई सिक्युरिटी इंटिग्रेटेड कंपनीचे (तेरखेडा) पेट्रोलिंग कर्मचारी दत्तात्रय कागदे हे गस्तीवर असताना दोन विनाक्रमांक मोटारसायकलवरून चार इसम त्या ठिकाणी आले. त्यांनी ड्युटीवर असलेल्या कागदे यांच्यावर अचानक दगडफेक सुरू केली.

यावेळी सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून प्रतिकार केला असता, आरोपी पळून जाऊ लागले. मात्र, पळून जाणाऱ्यांपैकी राहुल रामचंद्र काळे (मूळ रा. रामेश्वरवाडी, ता. केज, जि. बीड, सध्या रा. पारगाव, ता. वाशी) याला मोटारसायकलसह पकडण्यात आले. त्याच्याकडे दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीसाठी आणलेले तलवारसदृश शस्त्र आणि लोखंडी कत्ती असा मुद्देमाल मिळून आला.

या घटनेप्रकरणी साई सिक्युरिटी कंपनीचे सुरक्षारक्षक पर्यवेक्षक शिवहार बाळकृष्ण राऊत (वय ३४, रा. वाणी गल्ली, वाशी, जि. धाराशिव) यांनी शनिवारी (ता. ११ एप्रिल) वाशी पोलिस ठाण्यात प्रथम खबर दिली.

यावरून रंगेहाथ पकडलेला आरोपी राहुल काळे याच्यासह पळून गेलेले त्याचे साथीदार राजू अर्जुन पवार (रा. हिवरा), दादा शामराव काळे (रा. बारलोणी पारधी पिढी, ता. वाशी) आणि चिवल्या ऊर्फ बबन सोपान काळे (रा. खैराड वस्ती, वाशी, जि. धाराशिव) यांच्यावर भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम ३१०(४) सह शस्त्र अधिनियम (Arms Act) ४/२५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशी पोलिस करत आहेत.

Previous Post

चोरीच्या संशयावरून जमावाकडून बेदम मारहाण; एकाचा मृत्यू, निलेगाव येथील १६ जणांवर खुनासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Next Post

‘ऑपरेशन टायगर’ करायला गेले, अन् स्वतःच्याच ‘वाघांना’ पिंजऱ्यात कोंडले!

Next Post
‘ऑपरेशन टायगर’ करायला गेले, अन् स्वतःच्याच ‘वाघांना’ पिंजऱ्यात कोंडले!

‘ऑपरेशन टायगर’ करायला गेले, अन् स्वतःच्याच 'वाघांना' पिंजऱ्यात कोंडले!

ताज्या बातम्या

शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

September 5, 2026
मराठवाड्याच्या विकासावरून शिवसेना (UBT) आक्रमक; ‘तुमसे ना हो पायेगा!’ आंदोलनाची तयारी

मराठवाड्याच्या विकासावरून शिवसेना (UBT) आक्रमक; ‘तुमसे ना हो पायेगा!’ आंदोलनाची तयारी

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 5, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026

Recent Posts

  • शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!
  • मराठवाड्याच्या विकासावरून शिवसेना (UBT) आक्रमक; ‘तुमसे ना हो पायेगा!’ आंदोलनाची तयारी
  • संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?
  • नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!