बेंबळी :आरोपी नामे-बालाजी यल्लाप्पा पारसे,2 ) बब्रुवान यल्लाप्पा पारसे दोघे रा. कामेगाव ता.जि. धाराशिव यांनी दि. 31.01.2024 रोजी कामेगाव येथे फिर्यादी नामे- अनिता बालाजी वाघमारे, वय 365 वर्षे, व्यवसाय सरपंच ग्रामपंचायत कार्यालय कामेगाव रा. कामेगाव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी कामेगाव येथील मालमत्ता क्र 94/1 मध्ये घरकुल बांधणे अपेक्षित होते परंतु नमुद आरोपींनी घरकुल गावठाण जागेवर बांधण्यास सुरुवात केल्याने त्यांना ग्रामपंचायत कार्यालयाचे जागेत घरकुल बांधू नका असे सांगण्यास फिर्यादी व ग्रामसेवक गेले असता व ग्रामसेवक हे नमुद आरोपीच्या घराच्या भिंतीवर नोटीस चिकटवतो असताना नमुद आरोपींनी फिर्यादीस व ग्रामसेवक यांना शिवीगाळ करुन ग्रामसेवक यांना तुला ॲट्रोसिटी मध्येच गुंतवतो अशी धमकी देवून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अनिता वाघमारे यांनी दि.31.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 353, 509, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
हदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
शिराढोण : आरोपी नामे-1)केरबाजिजाबा निवळकर, वय 35 वर्षे, रा. हिंगणगांव ता. कळंब जि.धाराशिव, हे दि.31.01.2024 रोजी 14.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 1769 हा शिराढोण बसस्थानक समोर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना शिराढोण पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये शिराढोण पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.