• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; उमरगा, लोहारा व परंड्यात १ लाख २० हजारांची चोरी

admin by admin
April 15, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून उमरगा, लोहारा आणि परंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या तीन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात दुचाकी, रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (भा.न्या.सं.) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उमरग्यातून दुचाकी लंपास

लातूर जिल्ह्यातील कासारशिरसी (ता. निलंगा) येथील अमित मनोज तुडुंम (वय २३) यांची दुचाकी उमरगा येथून चोरीला गेली. रविवारी (ता. १२) मध्यरात्री एक ते तीन वाजेच्या सुमारास त्यांनी आपली हिरो स्पलेंडर दुचाकी उमरगा येथील इनामदार हॉस्पिटलसमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्यांनी गाडीचे कुलूप तोडून ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी अमित तुडुंम यांनी १३ एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्डी  येथे घरात घुसून चोरी

दुसरी घटना लोहारा तालुक्यातील मार्डी येथे घडली. हिराचंद्र बाजीराव देवकर (वय ७१) हे घरात झोपले असताना, मंगळवारी (ता. १४) मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने लाकडाच्या साहाय्याने त्यांच्या उशाजवळ ठेवलेली गेटची चावी काढली. या चावीने गेटचे कुलूप उघडून घरात प्रवेश करत चोरट्याने रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भांडगाव येथे दागिन्यांवर डल्ला

परंडा तालुक्यातील भांडगाव येथेही घरफोडीची घटना घडली. आशाबाई विलास अंधारे (वय ४७) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. सोमवार (ता. १३) सायंकाळी सात ते मंगळवार (ता. १४) सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी घरातील कपाट फोडून त्यातील सोने-चांदीचे दागिने असा एकूण ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी आशाबाई अंधारे यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५ (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

जंगलात महिलेवर लैंगिक अत्याचार; बेंबळी पोलिस ठाण्यात तरुणावर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिवमध्ये डॉल्बीचा दणदणाट भोवला; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४२ डीजे मालक व आयोजकांवर गुन्हे दाखल

Next Post
धाराशिवमध्ये डॉल्बीचा दणदणाट भोवला; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४२ डीजे मालक व आयोजकांवर गुन्हे दाखल

धाराशिवमध्ये डॉल्बीचा दणदणाट भोवला; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४२ डीजे मालक व आयोजकांवर गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद

September 6, 2026
अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

September 6, 2026
धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
  • काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा
  • तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद
  • अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले
  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!