• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये डॉल्बीचा दणदणाट भोवला; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४२ डीजे मालक व आयोजकांवर गुन्हे दाखल

admin by admin
April 16, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये डॉल्बीचा दणदणाट भोवला; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४२ डीजे मालक व आयोजकांवर गुन्हे दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: शहरात १४ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडून कर्णकर्कश आवाजात डीजे (डॉल्बी) वाजवणाऱ्यांवर धाराशिव शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या पूर्वसूचना आणि घटनास्थळी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या तब्बल ४२ डीजे मालक आणि आयोजकांवर वेगवेगळ्या तीन प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 शहरात १४ एप्रिल रोजी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या साऊंड (डीजे) मालक व आयोजकांना पोलीस अधीक्षक यांच्यातर्फे अटी व शर्तींच्या अधीन राहून परवाने देण्यात आले होते. तसेच मिरवणुकीदरम्यान नियमांचा भंग होऊ नये यासाठी धाराशिव शहर पोलिसांकडून बीएनएसएसचे कलम १६८ प्रमाणे कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती.

मात्र, मिरवणुकीदरम्यान क्रांती चौक, काळा मारुती चौक, सम्राट चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर डॉल्बी साऊंड सिस्टीमवर (टॉप आणि बेस) अतिशय कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवली जात होती. या प्रचंड आवाजामुळे मिरवणूक पाहण्यासाठी जमलेले नागरिक, महिला आणि बंदोबस्तावरील पोलिसांनाही प्रचंड शारीरिक त्रास जाणवू लागला. ध्वनी प्रदूषणाने लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे पाहून बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी डीजे मालक आणि आयोजकांना प्रत्यक्ष भेटून आवाज कमी करण्याच्या वारंवार सूचना दिल्या. परंतु, संबंधितांनी पोलिसांच्या या सूचनांना केराची टोपली दाखवत आवाजाची मर्यादा ओलांडली.

परराज्यातील आणि परजिल्ह्यातील डीजे चालकांचाही समावेश

या बेजबाबदार कृत्यामुळे पोलीस निरीक्षक दराडे यांच्या आदेशानुसार, पोलीस उपनिरीक्षक संदीप शहाजी ओहोळ (वय ३९) यांच्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात पंधरा तारखेला रात्री उशिरा तीन स्वतंत्र गुन्हे (गु.र.नं. १४४/२०२६, १४५/२०२६ आणि १४६/२०२६) दाखल करण्यात आले आहेत.

या गुन्ह्यांमध्ये बीएनएसचे कलम २२३, २८९, २९२, २९३ सह पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम ३, १५ आणि ध्वनी प्रदूषण (नियम आणि नियंत्रण) २००० चे कलम ३, ४, ५ व ६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण ४२ जणांवर कारवाई करण्यात आली असून, यामध्ये केवळ धाराशिव जिल्ह्यातीलच नव्हे, तर सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, अहिल्यानगर आणि अगदी कर्नाटक (बेळगाव) येथील डीजे चालकांचाही समावेश आहे. या सर्व प्रकरणांचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिघोळे हे करत आहेत.

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरात विनापरवाना आणि नियमांचे उल्लंघन करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

गुन्हा क्रमांक १: (गु.र.नं. १४४/२०२६)

  • घटनास्थळ व वेळ: क्रांती चौक ते सम्राट चौक दरम्यान (१४ एप्रिल, सायंकाळी १७.२५ ते १९.४४ वाजेपर्यंत)

  • दाखल केलेले आरोपी (एकूण १४):

    १) सम्यक कुंदन चिलवंत (रा. बौद्ध नगर, धाराशिव)

    २) सागर दगडू गायकवाड (रा. घेवुर, जि. पुणे)

    ३) अभिषेक बालाजी सूर्यवंशी (रा. भीम नगर, धाराशिव)

    ४) सोमेश्वर संजय मोरे (रा. माळशिरस, जि. सोलापूर)

    ५) दत्ता भालचंद्र धावारे (रा. सांजा रोड, सिद्धार्थ नगर, धाराशिव)

    ६) साई संतोष साखरे (रा. भामाठाण, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर)

    ७) निलेश कुंदन जानराव (रा. बालाजी नगर, धाराशिव)

    ८) फैयाज अब्दुल पठाण (रा. अंबेजवळगे, जि. धाराशिव)

    ९) दर्शन उमाकांत माळाळे (रा. भीम नगर, धाराशिव)

    १०) विवेक सुनील भोसले (रा. कळकी, ता. फलटण, जि. सातारा)

    ११) गौतम दत्तात्रय सोनवणे (रा. बौद्ध नगर, धाराशिव)

    १२) प्रणव संतोष कोतवाल (रा. अष्टापूर, ता. हवेली, जि. पुणे)

    १३) सिद्धांत कमलाकर बनसोडे (रा. सुभेदार रामजी आंबेडकर नगर, धाराशिव)

    १४) आकाश शिवाजी लंके (रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर)


गुन्हा क्रमांक २: (गु.र.नं. १४५/२०२६)

  • घटनास्थळ व वेळ: काळा मारुती चौक ते सम्राट चौक दरम्यान (१४ एप्रिल, रात्री १९.४६ ते २१.३८ वाजेपर्यंत)

  • दाखल केलेले आरोपी (एकूण १४):

    १) चेतन किसन मस्के (रा. बेगडा, जि. धाराशिव, ह.मु. कुरणे नगर)

    २) दयानंद माणिक पाटील (रा. पाखरी सावकर नगर, ठाणे)

    ३) निखिल राजेंद्र मंजुळे (रा. वडार गल्ली, धाराशिव)

    ४) भगीरथ राजेंद्र कोबरणे (रा. गणेगाव, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर)

    ५) फरदीन फिरोज कुरेशी (रा. रसूलपुरा, धाराशिव)

    ६) संकेत प्रकाश पाटील (रा. कुमठे, ता. तासगाव, जि. सांगली)

    ७) एजाज दगडू शेख (रा. धानासुर मर्दिनी रोड, धाराशिव)

    ८) नामदेव ऊर्फ धनंजय लिंबराज राऊत (रा. उळे, ता. द. सोलापूर)

    ९) आमन महेश कठारे (रा. जुना बस डेपो जवळ, धाराशिव)

    १०) विशाल भोला वाघमारे (रा. आजमेरा, पिंपरी चिंचवड)

    ११) हसन पापा शेख (रा. तुळजापूर नाका, धाराशिव)

    १२) शुभम बापू बनसोडे (रा. तुळजापूर नाका, धाराशिव)

    १३) साईराज गौतम इंगळे (रा. भीम नगर, धाराशिव)

    १४) गोपाळ रामू अकोळे (रा. करूर, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक)


गुन्हा क्रमांक ३: (गु.र.नं. १४६/२०२६)

  • घटनास्थळ व वेळ: सम्राट चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान (१४ एप्रिल, रात्री २१.३६ ते २२.१६ वाजेपर्यंत)

  • दाखल केलेले आरोपी (एकूण १४):

    १) करण अशोक नागटिळक (रा. भीम नगर, धाराशिव)

    २) किरण दत्तात्रय निकम (रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा)

    ३) रोहित बुद्धमणी शिंगाडे (रा. बौद्ध नगर, धाराशिव)

    ४) गोविंद ज्ञानेश्वर ढेरंगे (रा. कोरेगाव भिमा, ता. शिरूर, जि. पुणे)

    ५) देवदत्त सुभाष लोमटे (रा. खेड, जि. धाराशिव)

    ६) प्रतीक शंकर लांडगे (रा. विजापूर रोड, झोपडपट्टी नं २, सोलापूर)

    ७) अर्जुन वैभव माळाळे (रा. भीम नगर, धाराशिव)

    ८) संकेत राजेंद्र बाबर (रा. चिखली, ता. वाई, जि. सातारा)

    ९) प्रवीण अभिमान सिरसाटे (रा. भीम नगर, धाराशिव)

    १०) मस्तान ऊर्फ सलमान इक्बाल शेख (रा. अक्कलकोट रोड, सोलापूर)

    ११) उमेश प्रकाश माने (रा. बौद्ध नगर, धाराशिव)

    १२) संकेत अर्जुन जगदाळे (रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा)

    १३) किशोर सोमनाथ नागटिळक (रा. फकिरा नगर, धाराशिव)

    १४) अविनाश दिलीप गोंगावले (रा. पाटील आळी, सुपे खुर्द, ता. पुरंदर, जि. पुणे)

या तिन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिघोळे हे करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; उमरगा, लोहारा व परंड्यात १ लाख २० हजारांची चोरी

Next Post

मंगरूळमध्ये तरुणाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट फरफटत नेला, पत्नीसह ७ जण ताब्यात

Next Post
मंगरूळ खून प्रकरणाचा २४ तासांत छडा; अनैतिक संबंधातून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने संपवले

मंगरूळमध्ये तरुणाचा निर्घृण खून; मृतदेह ९० फूट फरफटत नेला, पत्नीसह ७ जण ताब्यात

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद

September 6, 2026
अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

September 6, 2026
धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
  • काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा
  • तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद
  • अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले
  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!