• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

admin by admin
April 20, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : मलंग कॉम्प्लेक्स येथील एका कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने येऊन एका अज्ञात चोरट्याने काउंटरखाली ठेवलेली तब्बल १ लाख ९० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग हातोहात लांबवल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी (ता. १७) दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रविवारी (ता. १९) उमरगा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण दिनेश गेहलोत (वय २४, रा. नेहरू नगर, कुर्ला पूर्व, मुंबई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण गेहलोत हे मलंग कॉम्प्लेक्स येथे असलेल्या त्यांच्या भावाच्या कपड्याच्या दुकानात आले होते. शुक्रवारी दुपारी जेवणासाठी जाताना त्यांनी पैशांची एक काळ्या रंगाची बॅग दुकानातील काउंटर टेबलच्या खाली ठेवली होती. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला. त्याने प्रविण यांच्या भावाची नजर चुकवून काउंटरखालील १ लाख ९० हजार रुपयांची रोकड असलेली ती बॅग अत्यंत शिताफीने चोरून नेली.

पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर प्रविण गेहलोत यांनी उमरगा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून उमरगा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या चोरीचा पुढील तपास पोलिस करत आहेत.


 टाकळी शिवारातून बोकड चोरीला; एका परिचितासह दोघांवर गुन्हा दाखल

परंडा : शेतात बांधलेले सुमारे १० हजार रुपये किमतीचे बोकड चोरून नेल्याची घटना टाकळी (ता. परंडा) येथील शिवारात शनिवारी (ता. १८) रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रविवारी (ता. १९) परंडा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमंत संदीपान जाधव (वय ३५, रा. टाकळी, ता. परंडा, जि. धाराशिव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. तर ब्रम्हदेव दत्तु कातुरे (रा. सावदरवाडी, ता. परंडा) आणि त्याचा एक अनोळखी साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हनुमंत जाधव यांनी त्यांच्या शेत गट क्रमांक ११४ मध्ये आपले बोकड बांधले होते. शनिवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास आरोपी ब्रम्हदेव कातुरे व त्याच्या एका अनोळखी साथीदाराने हे १० हजार रुपये किमतीचे बोकड चोरून नेले.

याप्रकरणी हनुमंत जाधव यांनी रविवारी परंडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून परंडा पोलिसांनी आरोपी ब्रम्हदेव कातुरे व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलिस करत आहेत.

Previous Post

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

Next Post
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र 'रास्ता रोको'

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : ६७ वर्षीय वृद्ध वडिलांना मुलगा अन् सुनेकडून लाथाबुक्क्यांनी, चपलेने बेदम मारहाण

October 23, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव : ‘गॅस पाईपलाईन अपडेट’च्या नावाखाली ६६ वर्षीय ज्येष्ठ महिलेला पावणेआठ लाखांचा गंडा

October 23, 2026

Recent Posts

  • भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई
  • धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला
  • धाराशिव : ६७ वर्षीय वृद्ध वडिलांना मुलगा अन् सुनेकडून लाथाबुक्क्यांनी, चपलेने बेदम मारहाण
  • धाराशिव : ‘गॅस पाईपलाईन अपडेट’च्या नावाखाली ६६ वर्षीय ज्येष्ठ महिलेला पावणेआठ लाखांचा गंडा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!