• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

admin by admin
April 21, 2026
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उस्मानाबादचे ‘धाराशिव’ झाले. शहराचे नामांतर मोठा गाजावाजा करत साजरे करण्यात आले. नावाच्या नव्या पाटीसोबत शहराचे नशीबही बदलेल आणि विकासाची नवी पहाट उजाडेल, अशी भाबडी आशा धाराशिवकरांना होती. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांच्या पदरी घोर निराशाच पडली आहे. “केवळ नाव बदलून समस्या सुटत नाहीत,” हा कटू अनुभव सध्या धाराशिवकर रोज घेत आहेत. जिल्हा मुख्यालय असूनही एखाद्या शहराने ‘मागास’ किती असावे, याचे हे उत्तम (किंवा दुर्दैवी) उदाहरण ठरत आहे.

रस्त्यांची ‘धुळधाण’ अन् नित्यनियमाची वाहतूक कोंडी

शहराचा मुख्य रस्ता असलेल्या बार्शी नाका ते शहर पोलीस ठाणे या मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. एका बाजूच्या रस्त्याचे काम होऊन सहा महिने उलटले, तरी दुसऱ्या बाजूच्या रस्त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. या रखडलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी हा आता धाराशिवकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. नवीन झालेल्या रस्त्यावर प्रवेश करणे म्हणजे वाहनचालकांसाठी एखाद्या स्टंटमनसारखी जीवघेणी कसरत ठरत आहे; आणि दुर्दैवाने हे आता सर्वांच्या अंगवळणी पडले आहे. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असून, त्यांचे व्यवसाय पार धुळीस मिळाले आहेत.

मुलांनी सुट्टीत काय पुढाऱ्यांचे फ्लेक्स बघायचे?

सध्या मुलांच्या परीक्षा सुरू असून, लवकरच त्यांना उन्हाळी सुट्ट्या लागतील. सुट्टीत मुलांना घरात बसून टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा सल्ला देणे सोपे आहे, पण मग त्यांनी करायचे तरी काय? हा खरा प्रश्न आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या या शहरात मुलांच्या मनोरंजनासाठी ना एखादा जलतरण तलाव (स्विमिंग पूल) आहे, ना एखादा सुसज्ज बगीचा. मग, मुलांनी रस्त्याच्या दुतर्फा उडणारी धूळ खात, चौकाचौकात लागलेले पुढाऱ्यांचे मोठमोठे फ्लेक्स बघत फिरायचे का? असा संतप्त सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे.

नाव ‘वैद्यकीय महाविद्यालया’चे, पण रस्ता ‘सोलापूर’चा!

शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन आणि महागड्या वास्तू उभ्या राहत आहेत, पण सरकारी व्यवस्थेची मानसिकता मात्र अद्याप बदललेली नाही. शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले खरे; पण शासकीय जिल्हा रुग्णालयाची वर्षानुवर्षांची ओळख असलेली “सोलापूरला रेफर” करण्याची प्रथा अजूनही पुसली गेलेली नाही. गंभीर रुग्णांना आजही उपचारासाठी सोलापूरची वाट धरावी लागते, हे या व्यवस्थेचे मोठे अपयश आहे.

मूलभूत सुविधांची वानवा अन् मोकाट कुत्र्यांची दहशत

एकीकडे शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असला तरी, स्थानिक प्रशासनाला त्याचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन, शहराची नियमित स्वच्छता आणि शहर वाहतुकीसाठी ‘सिटीबस’ यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या नागरी सुविधांकडे प्रशासनाकडून पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे. यातच भर म्हणून शहरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही.

प्रशासनाने आता भवितव्य रंगवावे!

थोडक्यात सांगायचे तर, धाराशिव शहराची सद्यस्थिती पाहिल्यावर कविवर्य सुरेश भट यांच्या, “हे असेच होते, ते ही तसेच होते, आपापल्या ठिकाणी सारे तसेच होते,” या ओळी अगदी चपखल लागू पडतात. नाव बदलून ऐतिहासिक वारसा नक्कीच जपला गेला; पण जोपर्यंत रस्ते, आरोग्य, पाणी आणि उद्यानांसारख्या मूलभूत प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, तोपर्यंत धाराशिव खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ किंवा विकसित होणार नाही. प्रशासनाने केवळ पाटी रंगवण्यावर धन्यता न मानता, आता शहराचे भविष्य रंगवण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.


■ सवाल धाराशिवकरांचा…

धाराशिवच्या या दुरवस्थेला नक्की जबाबदार कोण? सुस्त प्रशासन, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव की आपलीच नागरिक म्हणून असलेली उदासीनता? यावर आता गांभीर्याने आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

Previous Post

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

Next Post

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

Next Post
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026
शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
  • कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल
  • हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!