• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तामलवाडीतील मिलन लॉजवर छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन बांगलादेशी महिला पोलिसांच्या जाळ्यात

धाराशिव जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांचा शिरकाव; 'मिलन लॉज'वरील कारवाईने खळबळ, तपासात भाषेचा अडथळा

admin by admin
April 25, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तामलवाडीतील मिलन लॉजवर छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन बांगलादेशी महिला पोलिसांच्या जाळ्यात
0
SHARES
2.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव :  तामलवाडी  येथील ‘मिलन लॉज’वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने छापा टाकून सुरू असलेल्या कुंटणखान्याचा (वेश्या व्यवसायाचा) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, धक्कादायक बाब म्हणजे यातील दोन महिला या बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या या महिलांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तामलवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील मिलन लॉजमध्ये काही महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने नियोजन करून नमूद ठिकाणी अचानक छापा टाकला. त्यावेळी लॉजमध्ये तीन महिला आढळून आल्या. महिला पोलिसांमार्फत त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

महिलांच्या जबाबातून निष्पन्न झाले की, आरोपी दिलीप सिद्धाप्पा मंगरुळे (वय ४३, मूळ रा. अविनाश नगर, एमआयडीसी, सोलापूर) आणि संतोष नामदेव पवार (वय ४०, मूळ रा. तिऱ्हे, ता. उत्तर सोलापूर) हे दोघे त्यांना व्यावसायिक फायद्यासाठी आश्रय देऊन लैंगिक स्वैराचारासाठी प्रवृत्त करत होते. तसेच, या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांवर हे आरोपी स्वतःची उपजीविका करत असल्याचेही समोर आले आहे.

पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन, पिग्मीचे छोटे पासबुक, ग्राहकांच्या नोंदीचे रजिस्टर, युपीआय स्कॅनर व मशीन, मिलन लॉजचा परवाना फॉर्म, ५ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम आणि निरोधची पाकिटे असा एकूण २५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुटका करण्यात आलेल्या महिलांची सुरक्षित स्थळी रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणी आरोपी दिलीप मंगरुळे आणि संतोष पवार (सध्या दोघेही रा. मिलन लॉज, तामलवाडी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) ६०/२०२६ नुसार कलम १४३, १४४, ३(५) सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) कलम ३, ४, ५ अन्वये तामलवाडी पोलीस ठाण्यात २४ एप्रिल रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसही झाले अवाक

ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची प्राथमिक माहिती घेतली असता, त्यापैकी दोन महिला या मूळच्या बांगलादेशातील असल्याचे निष्पन्न झाले. ग्रामीण भागातील एका लॉजवर थेट बांगलादेशी महिला आढळून आल्याने पोलिसही अवाक झाले. जिल्ह्यात परदेशी नागरिकांचा, विशेषतः बांगलादेशींचा असा बेकायदेशीर वावर समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

तपासात भाषेची मोठी अडचण

या दोन्ही बांगलादेशी महिलांना सध्या धाराशिव पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. या महिलांनी सीमा कशी ओलांडली? त्यांना धाराशिवपर्यंत कोणी आणले? यामागे मानवी तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय आहे का? यादृष्टीने पोलिसांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, या महिलांना केवळ त्यांचीच मातृभाषा येत असल्याने पोलिसांना संवादात मोठी अडचण येत आहे. भाषेच्या या अडथळ्यामुळे तपासाचा वेग संथ असला, तरी लवकरच दुभाषिकाच्या मदतीने या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

तामलवाडी पोलिसांच्या आशीर्वादामुळे मिलन लॉजवर अवैध वेश्या व्यवसाय सुरु होता. धाराशिव पोलिसांच्या कारवाईमुळे त्याचा पर्दाफाश झाला झाला आहे.

Previous Post

फेसबुक पिंट्या उर्फ पावशेरसिंहाचा नवा ‘बॉम्ब’! लेदर, टेक्सटाईल गेलं हवेत, आता कौडगावात थेट ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब’?

Next Post

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकाला बेड्या

Next Post
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकाला बेड्या

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकाला बेड्या

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात गुटखा माफियावर पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक! शम्स चौकात १७.८२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा

धाराशिव शहरात गुटखा माफियावर पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक! शम्स चौकात १७.८२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा

July 29, 2026
काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

काळे अपमान प्रकरण तापले; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्र्यांची भेट घेणार शिष्टमंडळ, भाजपची जुनी टीम आक्रमक

July 28, 2026
विमा घोटाळा प्रकरणात ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

विमा घोटाळा प्रकरणात ‘ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

July 28, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; दुचाकी, सोलर केबल आणि बोअरवेलची वायर लंपास

July 28, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नळदुर्गात बँक अधिकाऱ्याच्या साहाय्याने मयत आई अन् आजारी वडिलांच्या बनावट सह्या करून कर्जाची उचल

July 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!