• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकाला बेड्या

admin by admin
April 25, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
शिराढोण येथील दुकानातील कॉपर वायर चोरी उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, एकाला बेड्या
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : शिराढोण येथील एका दुकानातून शेकडो किलो कॉपर वायरची (तांब्याची तार) चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने वाशी फाटा परिसरातून गुरुवारी (ता. २३) गजाआड केले. या कारवाईत आरोपीकडून १७ किलो कॉपर वायर आणि गुन्ह्यात वापरलेली टाटा सुमो जीप असा एकूण ३ लाख ७० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धनाजी बाबुराव पवार (रा. आळणी फाटा, रेल्वे स्टेशनजवळ, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार शिवाजी सर्जेराव काळे (रा. अंदोरा, सध्या मु. कन्हेरवाडी पाटी, ता. कळंब) याचा पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि त्यांचे पथक मालमत्तेविषयक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी गस्तीवर होते. यादरम्यान, शिराढोण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कॉपर वायर चोरीतील (गु.र.नं. १३/२०२६) आरोपी धनाजी पवार हा चोरीचा माल विकण्यासाठी वाशी फाटा येथे थांबल्याची खात्रीलायक माहिती एका गुप्त बातमीदारामार्फत पथकाला मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाशी फाटा परिसरात सापळा रचून धनाजी पवार याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने आपला साथीदार शिवाजी काळे याच्या मदतीने शिराढोण येथील एका दुकानातून २०० ते २५० किलो कॉपर वायर चोरल्याची कबुली दिली. ही चोरी करण्यासाठी त्यांनी ‘एमएच १४ सीएक्स २३७७’ या क्रमांकाच्या टाटा सुमो जीपचा वापर केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून १७ किलो कॉपर वायर व गुन्ह्यात वापरलेली जीप हस्तगत केली आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वात, सपोनि अमोल मोरे, पोलीस अंमलदार सचिन खटके, अमोल चव्हाण, बळीराम शिंदे, अमोल निंबाळकर, राहुल नाईकवाडी, महिला पोलीस अंमलदार शोभा बांगर आणि चालक विनायक दहिहंडे यांच्या पथकाने केली. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

तामलवाडीतील मिलन लॉजवर छापा; वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन बांगलादेशी महिला पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

पत्नीशी फोनवर बोलल्याचा जाब विचारल्याने बाप-लेकाला बेदम मारहाण; आळणी येथील घटना

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

पत्नीशी फोनवर बोलल्याचा जाब विचारल्याने बाप-लेकाला बेदम मारहाण; आळणी येथील घटना

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!