• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, April 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा येथील माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करून दरोडा टाकणारी टोळी २४ तासांत जेरबंद; धाराशिव गुन्हे शाखेची धडक कारवाई

admin by admin
April 26, 2026
in क्राईम
Reading Time: 2 mins read
परंडा येथील माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करून दरोडा टाकणारी टोळी २४ तासांत जेरबंद; धाराशिव गुन्हे शाखेची धडक कारवाई
0
SHARES
418
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: परंडा तालुक्यातील मौजे कुंभेज येथे एका माजी सैनिकाच्या शेतवस्तीवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या कुख्यात टोळीच्या अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळण्यात धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत ७ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता जगताप आणि त्यांचे पती विश्वनाथ जगताप हे सध्या त्यांच्या कुंभेजा येथील घरी आले होते. शुक्रवारी रात्री ते त्यांच्या शेतशिवारातील घरासमोरील अंगणात झोपले होते. शनिवारी (ता. २५) मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास सात अज्ञात दरोडेखोर तिथे आले. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या या टोळीतील दोघांनी घराबाहेर पाळत ठेवली.

दरम्यान, एका चोरट्याने झोपलेल्या लता जगताप यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे (अंदाजे ६० हजार रुपये किमतीचे) सोन्याचे गंठण जबरदस्तीने ओढून काढले. याच वेळी इतर दोन चोरट्यांनी विश्वनाथ जगताप यांना उठवून त्यांच्याकडे सोने आणि पैशांची मागणी केली. मात्र, विश्वनाथ जगताप यांनी त्यांना काहीही देण्यास ठाम नकार दिला. याचा राग आल्याने चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला चढवला आणि त्यांना गंभीर जखमी केले.

घटनेनंतर चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत तेथून पोबारा केला. या थरारक घटनेनंतर जखमी अवस्थेतील पतीला उपचारासाठी दाखल करून लता जगताप यांनी शनिवारी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी सात अज्ञात इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३११ अन्वये जबरी चोरी व दरोड्याचा गुन्हा दाखल केला .

घटनेचा तपशील

  • २५ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास कुंभेज परिसरातील कॅनॉलजवळ ही घटना घडली.

  • माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप आणि त्यांची पत्नी शेतवस्तीवरील राहत्या घरासमोर बाजेवर झोपले असताना काही अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.

  • दरोडेखोरांनी विश्वनाथ जगताप यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले व त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने काढून पळ काढला.

आव्हानात्मक तपास आणि पोलिसांची कारवाई

रात्रीच्या अंधारात घडलेली घटना, घाबरलेल्या अवस्थेतील फिर्यादी महिला आणि घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे या गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांसाठी अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र, गोपनीय बातमीदार आणि गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीवरून (Modus Operandi) पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला.

संशयित आरोपी डोकेवाडी शिवारातील एका शेतात थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नियोजन करून आरोपींना सर्व बाजूंनी घेरले. यावेळी काही जणांनी शेतातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना शिताफीने पकडले.

अटक करण्यात आलेले आरोपी

पोलिसांनी एकूण ७ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

  • किरण पंडीत शिंदे (वय २६ वर्षे, रा. अनाळा)

  • राघवा निवांत्या शिंदे (वय २५ वर्षे, रा. अनाळा)

  • ज्ञानेश्वर लिंग्या काळे (वय २३ वर्षे, रा. हिवर्डा)

  • विकास नागेश भोसले (वय २९ वर्षे, रा. डोकेवाडी)

  • सुनिल प्रकाश भोसले (वय २२ वर्षे, रा. अंजनसोंडा)

  • चेतन किरण शिंदे (वय १९ वर्षे, रा. अनाळा)

  • सुनिल चरण शिंदे (वय २२ वर्षे, रा. अनाळा)

गुन्ह्याची कबुली आणि मुद्देमाल जप्त

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. दोन मोटारसायकलवर येऊन त्यांनी हा दरोडा टाकला. झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावताना माजी सैनिकाने एका आरोपीला पकडले होते, त्यावेळी स्वतःची सुटका करण्यासाठी त्यांनी तोंड दाबून चाकूने वार केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर काळे याच्या पँटच्या खिशातून महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन आणि गुन्ह्यात वापरलेल्या १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, सपोनि अमोल मोरे व त्यांच्या आरसीपी पथकाने केली आहे.

 

Previous Post

 वादग्रस्त ‘स्वयंघोषित राष्ट्रसंत’ लोमटे महाराजांच्या मठात १५ वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; ५ तासांनंतरही प्रशासन बेपत्ता

Next Post

विमा कंपनीची नफेखोरी आणि शासनाची बघ्याची भूमिका! धाराशिवचे शेतकरी वाऱ्यावर

Next Post
विमा कंपनीची नफेखोरी आणि शासनाची बघ्याची भूमिका! धाराशिवचे शेतकरी वाऱ्यावर

विमा कंपनीची नफेखोरी आणि शासनाची बघ्याची भूमिका! धाराशिवचे शेतकरी वाऱ्यावर

ताज्या बातम्या

विमा कंपनीची नफेखोरी आणि शासनाची बघ्याची भूमिका! धाराशिवचे शेतकरी वाऱ्यावर

विमा कंपनीची नफेखोरी आणि शासनाची बघ्याची भूमिका! धाराशिवचे शेतकरी वाऱ्यावर

April 26, 2026
परंडा येथील माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करून दरोडा टाकणारी टोळी २४ तासांत जेरबंद; धाराशिव गुन्हे शाखेची धडक कारवाई

परंडा येथील माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला करून दरोडा टाकणारी टोळी २४ तासांत जेरबंद; धाराशिव गुन्हे शाखेची धडक कारवाई

April 26, 2026
 वादग्रस्त ‘स्वयंघोषित राष्ट्रसंत’ लोमटे महाराजांच्या मठात १५ वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; ५ तासांनंतरही प्रशासन बेपत्ता

 वादग्रस्त ‘स्वयंघोषित राष्ट्रसंत’ लोमटे महाराजांच्या मठात १५ वर्षीय वारकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू; ५ तासांनंतरही प्रशासन बेपत्ता

April 26, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; नळदुर्गमध्ये सव्वाआठ लाखांची चोरी, तर मंदिरे आणि बसस्थानकालाही केले लक्ष्य

April 26, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंड्यात मध्यरात्री दरोड्याचा थरार: दागिन्यांसाठी वृद्धावर चाकूने हल्ला, पत्नीचे सोन्याचे गंठण लुटले

April 26, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group