• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आनंदनगर पोलिसांचा आणखी एक प्रताप: “चोर पकडला तरी दागिने परत मिळतीलच याची गॅरंटी नाही”; आनंदनगर पोलिसांच्या उत्तराने फिर्यादीला धक्का!

admin by admin
April 27, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
आनंदनगर पोलिसांचा आणखी एक प्रताप: “चोर पकडला तरी दागिने परत मिळतीलच याची गॅरंटी नाही”; आनंदनगर पोलिसांच्या उत्तराने फिर्यादीला धक्का!

आरोपी दिपाली काळे

0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: बस स्थानकावर प्रवाशाचे पैसे चोरणाऱ्या भामट्याला सोडून देणाऱ्या धाराशिवच्या आनंदनगर पोलिसांचा आणखी एक भोंगळ आणि संतापजनक कारभार चव्हाट्यावर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी स्पष्ट दिसत असतानाही पोलीस कारवाई करत नाहीतच, उलट “आम्ही चोराला पकडले तरी तुमचे दागिने परत मिळतीलच असे नाही,” असे अजब आणि उद्विग्न करणारे उत्तर पोलिसांकडून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्याय मिळवण्यासाठी एका सामान्य महिलेला आता थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे धाव घ्यावी लागली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

  • चोरीची घटना: धाराशिव येथील मलेरिया कॉलनीत राहणाऱ्या स्नेहा मिनुनाथ फिस्के (वय ३०) या १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता परिवारासह सोलापूरला जाण्यासाठी धाराशिव बस स्थानकावरून शिवशाही बसमध्ये चढत होत्या.

  • ८० हजारांचे गंठण लांबवले: बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत दिपाली काळे (रा. साठेनगर) नामक महिलेने त्यांच्या पर्समधून सुमारे ८० हजार रुपये किमतीचे (३ तोळे ९४० ग्रॅम) सोन्याचे गंठण हातोहात लांबवले.

  • सीसीटीव्हीत आरोपी कैद: बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सदर महिला चोरी करताना स्पष्ट दिसली. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारी २०२६ रोजी रीतसर एफआयआर (गुन्हा क्र. ००४५) दाखल करण्यात आला.

पोलिसांची उडवाउडवी आणि अजब तर्क:

गुन्हा दाखल होऊन आणि सीसीटीव्हीत आरोपी स्पष्ट दिसत असूनही पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. आरोपी दिपाली काळे ही सराईत गुन्हेगार असून तिच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी स्नेहा फिस्के यांनी कारवाईसाठी वारंवार आनंदनगर पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवले, मात्र पोलिसांकडून त्यांना केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

कहर म्हणजे, पोलिसांनी फिर्यादीला स्पष्टपणे सांगितले की, “जरी आम्ही त्या चोराला पकडले, तरी त्यांच्याकडून चोरी केलेले गंठण रिकव्हर करता येत नाही”. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही.

थेट मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे धाव:

आनंदनगर पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेमुळे नक्कीच चोरांवर कारवाई होईल की त्यांना पोलिसांकडूनच अभय दिले जाईल, अशी शंका फिर्यादीने व्यक्त केली आहे. पोलिसांकडून न्याय मिळण्याची आशा मावळल्याने, स्नेहा फिस्के यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे २४ आणि २५ मार्च २०२६ रोजी लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.

एकीकडे पोलीस गुन्हेगारांना पकडण्याऐवजी त्यांच्या वकिलासारखी भाषा करत असतील, तर सर्वसामान्यांनी न्याय मागायला कुणाकडे जायचे? हा संतप्त सवाल आता धाराशिवकर विचारत आहेत.

Previous Post

“फक्त सोनं चोरत जा रे…”; धाराशिव पोलिसांचा चोरांना मोलाचा सल्ला! ९ हजारांच्या चोरीत ३३०० चा ‘रिफंड’ आणि चोराला थेट ‘क्लीन चिट’

Next Post

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक; कामेगाव येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शासकीय नोकरीचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक; कामेगाव येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!