• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, June 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

खामसवाडीत तरुणांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण; आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

admin by admin
April 30, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील एका तरुणाला आणि त्याच्या मामभावाला खामसवाडी (ता. धाराशिव) येथे गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (ता. २८) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या मारहाणीत दोघे जखमी झाले असून, याप्रकरणी बेंबळी पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अमर सतीश सोनवणे (वय २५, रा. कात्री, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी फिर्याद दिली आहे. अमर सोनवणे आणि त्यांचे मामभाऊ दत्ता अवधुते हे मंगळवारी (ता. २८) रात्री २२.३० वाजेच्या सुमारास खामसवाडी येथे असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांना गाठले. यावेळी आरोपींनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण केली. या मारहाणीत दोघेही जखमी झाले आहेत. तसेच, आरोपींनी घराच्या पत्र्यावर दगड मारून नुकसानही केले.

या प्रकारानंतर अमर सोनवणे यांनी बुधवारी (ता. २९) बेंबळी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून खंडू बापू गुळवे, रणजित सुरेश गुळवे, महेश वैजिनाथ गुळवे, बालाजी अरुण गुळवे, यश ज्ञानेश्वर गुळवे, नागेश ज्ञानेश्वर गुळवे, सोमनाथ भोसले आणि राजेंद्र सुभाष गुळवे (सर्व रा. खामसवाडी, ता. जि. धाराशिव) या आठ जणांविरुद्ध बेंबळी पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३३३, ३२४(४), १८९, १९०, १९१ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) कलम ३(१)(आर) आणि ३(१)(एस) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास बेंबळी पोलिस करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना; वाशी आणि मुरुम पोलिसांत पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल

Next Post

कळंबमध्ये साडेचार लाखांची घरफोडी, तर धाराशिवमध्ये दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंबमध्ये साडेचार लाखांची घरफोडी, तर धाराशिवमध्ये दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

मुरुम पोलिसांची मोठी कारवाई! अचलेर तांड्यात विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्याला रंगेहात पकडले; गावठी कट्टा जप्त

June 14, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी चाललेली जनावरांची बेकायदेशीर वाहतूक येरमाळा पोलिसांकडून उघड; २ जर्सी गायींसह ४ वासरांची सुटका

June 14, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

चालत्या आयशर टॅम्पोमधून खाद्यतेलाचे बॉक्स लंपास; चोरांनी केले हजारो रुपयांचे नुकसान, येरमाळा पोलिसांत गुन्हा

June 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

खडकी शिवारात राडा! शेतातील मुरुम नेण्यास विरोध केल्याने वृद्धाला बेदम मारहाण , १४ जणांवर गुन्हा दाखल

June 14, 2026
घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!

भावाने पकडून दिले, पोलिसांनी पोलीस ठाण्यातून सोडून दिले!

June 14, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group