• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

साडेसांगवीत जलजीवनच्या कामात अडथळा; ग्रामसेवकाला दमदाटी करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

admin by admin
May 7, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम : तालुक्यातील साडेसांगवी येथे जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या पाणीपुरवठ्याच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून ग्रामसेवकाला शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. ‘तू गावाला पाणी कसे देतो, तेच बघतो,’ अशी धमकी देत विहिरीवरील शासकीय मोटार चालू न करू दिल्याने याप्रकरणी चौघांवर भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष किसन शेंबडे, कैलास किसन शेंबडे, योगेश चंद्रकांत शेंबडे आणि बालाजी भास्कर देवकते (सर्व रा. साडेसांगवी, ता. भूम) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, साडेसांगवी येथील ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) शशिकांत गजेंद्र पवार (वय ४२, रा. रामकृष्ण कॉलनी, धाराशिव) हे दि. ४ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत बाणगंगा नदीपात्रातील विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे आलेल्या उपरोक्त चारही आरोपींनी त्यांना विहिरीवरील शासकीय मोटार चालू करू दिली नाही. तसेच, जलजीवन योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या पाईपलाईनपैकी ९० मीटरचे काम अडवून ठेवले.

‘शासकीय पाईपलाईनचे काम का अडवून ठेवले आहे आणि गावाला पाणी का सोडू देत नाही?’ अशी विचारणा ग्रामसेवक पवार यांनी केली असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ‘तू कसे काम करतो आणि गावाला पाणी कसे देतो, तेच बघतो’ अशी थेट धमकी देऊन त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

याप्रकरणी शशिकांत पवार यांनी बुधवारी (दि. ६ मे) भूम पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या प्रथम खबरेवरून शासकीय कामात अडथळा आणि दमदाटी केल्याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, २९२, १२६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भूम पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या दोन घटना उघडकीस; येरमाळा व मुरुम पोलिसांत गुन्हे दाखल

Next Post

तुळजापुरात मध्यरात्री युवकावर जीवघेणा हल्ला; एमडी ड्रग्जच्या विळख्यात शहर, कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

Next Post
तुळजापुरात मध्यरात्री युवकावर जीवघेणा हल्ला; एमडी ड्रग्जच्या विळख्यात शहर, कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

तुळजापुरात मध्यरात्री युवकावर जीवघेणा हल्ला; एमडी ड्रग्जच्या विळख्यात शहर, कायदा-सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!