• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, June 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘सूर्यराजें’नी काढला ‘व्हिडिओ’ बॉम्ब! फेसबुक पिंट्या साहेब, आता तुम्ही पण एक ‘सेल्फी-व्हिडिओ’ काढा की!

admin by admin
June 24, 2026
in गोफणगुंडा
Reading Time: 1 min read
‘सूर्यराजें’नी काढला ‘व्हिडिओ’ बॉम्ब! फेसबुक पिंट्या साहेब, आता तुम्ही पण एक ‘सेल्फी-व्हिडिओ’ काढा की!
0
SHARES
228
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नमस्कार वाचकहो! धाराशिवच्या राजकारणातील ‘स्थगिती आणि श्रेयवादाच्या’ नाटकात आता एक नवा आणि भन्नाट ‘ट्विस्ट’ आला आहे. कालपर्यंत १८ कोटींच्या विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी ‘फेसबुक पिंट्या उर्फ पावशेरसिंह‘ आणि त्यांच्या पिलावळीने जी पोस्ट आणि पत्रकबाजीची ‘सर्कस’ चालवली होती, त्या सर्कशीचा तंबू ‘दबंग वाघ’ सूर्यराजेंनी एका झटक्यात उखडून टाकला आहे!

कसा? तर नुसत्या गप्पा मारून नाही, तर थेट ‘कॅमेऱ्यासमोर’ पुरावे सादर करून!

सूर्यराजेंचा ‘प्रूफ’ आणि भाजप पदाधिकाऱ्यांची धांदल!

सहा महिने १८ कोटींच्या फाईल्स कुजवत ठेवून, सूर्यराजे सत्तेत येताच अचानक जागे झालेल्या फेसबुक पिंट्यांच्या पिलावळीने कालपासून जोरात आरडाओरडा सुरू केला होता की, “हे काम तर आम्हीच केलंय!” पण श्रेय लाटण्याचा हा स्वस्त प्रयत्न सूर्यराजेंनी थेट ठाणेकर दाढीवाले सोबतचा एक कडक ‘व्हिडिओ’ पोस्ट करून हाणून पाडला.

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की धाराशिवच्या विकासासाठी आणि या १८ कोटींच्या कामांसाठी कुणी खऱ्या अर्थाने पाठपुरावा केला आणि कुणाच्या शब्दावर ही स्थगिती उठवली गेली. सूर्यराजेंनी ‘ऑन कॅमेरा’ हा पुरावा (Proof) दिल्यावर, श्रेय लाटण्यासाठी पुढे सरसावलेल्या ‘फेसबुक पिंट्या उर्फ पावशेरसिंह‘ मंडळींची आणि पाकीटमार पत्रकारांची चांगलीच धांदल उडाली आहे.

आता फेसबुक पिंट्यांना आमचं खुलं आव्हान!

साहेब, तुमचं नावच ‘फेसबुक पिंट्या’ आहे! मग आता सूर्यराजेंनी जसा ठाणेकर दाढीवाले साहेबांसोबतचा थेट व्हिडिओ पुरावा म्हणून दाखवला, तसा तुम्हीही एक ‘सेल्फी-व्हिडिओ’ काढा की!

जा, तुम्हीही एखाद्या मोठ्या नेत्याच्या बाजूला उभं राहा आणि सांगा की “ही स्थगिती मीच उठवली आहे!” पण प्रॉब्लेम असा आहे की, सहा महिने ज्यांनी स्थगितीवर काहीच केलं नाही, त्यांना व्हिडिओमध्ये उभं करायला कोणता नेता तयार होईल?

सूर्यराजेंची फेसबुक पोस्ट: विकासाचा नवा अध्याय!

सूर्यराजेंनी फक्त व्हिडिओच टाकला नाही, तर अत्यंत सविस्तर पोस्ट टाकून जनतेला हिशोब दिला आहे:

  • आठवडी बाजार विकसित करणे – ८ कोटी रुपये

  • राजमाता जिजाऊ उद्यान विकसित करणे – ५ कोटी रुपये

  • छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करणे – ३ कोटी रुपये

  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान विकसित करणे – २ कोटी रुपये

या १८ कोटींच्या कामांमुळे धाराशिव शहराच्या सौंदर्यात खऱ्या अर्थाने भर पडणार आहे. सूर्यराजेंनी स्पष्ट केलंय की धाराशिवच्या विकासाचा हा प्रवास असाच वेगाने सुरू राहील.

तात्पर्य:

‘फेसबुक पिंट्या’ साहेब, खोटं श्रेय लाटण्यासाठी फक्त ‘टायपिंग’ करून भागत नाही, तर कामाचं ‘प्रूफ’ द्यावं लागतं. सूर्यराजेंनी ‘व्हिडिओ’ बॉम्ब टाकून तुमचं आणि तुमच्या पिलावळीचं ‘क्रेडिट पॉलिटिक्स’ उद्ध्वस्त केलं आहे. आता तरी फुकटचं श्रेय घेणं थांबवा आणि यापुढची कामे कशी वेगात होतील याकडे लक्ष द्या!

– बोरूबहाद्दर

Previous Post

फेसबुक पिंट्या सहा महिने झोपला होता का?

ताज्या बातम्या

‘सूर्यराजें’नी काढला ‘व्हिडिओ’ बॉम्ब! फेसबुक पिंट्या साहेब, आता तुम्ही पण एक ‘सेल्फी-व्हिडिओ’ काढा की!

‘सूर्यराजें’नी काढला ‘व्हिडिओ’ बॉम्ब! फेसबुक पिंट्या साहेब, आता तुम्ही पण एक ‘सेल्फी-व्हिडिओ’ काढा की!

June 24, 2026
फेसबुक पिंट्या सहा महिने झोपला होता का?

फेसबुक पिंट्या सहा महिने झोपला होता का?

June 23, 2026
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: “१० कोटी सोडा, माफीही मागणार नाही”

विकासाच्या फाईलींना राजकारणाचा ब्रेक नको!

June 23, 2026

अखेर स्थगिती उठली; ओमराजेंच्या कामाचा धडाका सुरू, पत्रकबाजांवर सोमनाथ गुरव यांचा हल्लाबोल

June 23, 2026
निष्ठेची मशाल विझवून सत्तेचा धनुष्यबाण हाती; ओमराजेंची नवी राजकीय परीक्षा !

कालच शिंदेसेनेत एन्ट्री, आज धाराशिवसाठी १८ कोटींची लॉटरी!

June 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group