• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

फेसबुक पिंट्या सहा महिने झोपला होता का?

'सूर्यराजें'ची एन्ट्री, स्थगितीला 'करेक्ट कार्यक्रम' आणि साहेबांच्या छातीत धडधड!

admin by admin
June 23, 2026
in गोफणगुंडा
Reading Time: 1 min read
फेसबुक पिंट्या सहा महिने झोपला होता का?
0
SHARES
236
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नमस्कार वाचकहो! धाराशिवच्या राजकारणात सध्या एका ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटापेक्षाही जास्त सस्पेन्स आणि ड्रामा पाहायला मिळत आहे. या नव्या एपिसोडमध्ये आपले नेहमीचे हिरो-कम-व्हिलन, ‘फेसबुक पिंट्या उर्फ पावशेरसिंह’ यांची मोठी पंचाईत झाली आहे. कारण, नेहमी दुसऱ्याच्या कामाचं श्रेय लाटून ‘कॅमेरा-शो’ करणाऱ्या साहेबांना यावेळी थेट ‘दबंग वाघ’ सूर्यराजेंनी त्यांच्याच स्टाईलने ‘धोबीपछाड’ दिला आहे!

चला तर मग, पाहूया या १८ कोटींच्या विकासकामांच्या स्थगितीचा आणि श्रेयवादाचा हा नवा ‘सर्कस-शो’!

गुहा बदलली आणि वाघाने ‘स्थगिती’ फाडली!

धाराशिवच्या राजकारणातला दबंग वाघ ‘सूर्यराजे’ यांनी नुकतीच आपली राजकीय ‘गुहा’ बदलली आणि ते थेट ठाण्याचे ‘दाढीवाले’ साहेब यांच्याकडे गेले. तिथे गेल्या गेल्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी धाराशिवच्या विकासासाठी तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला!

हा निधी कशासाठी?

  • आठवडी बाजार विकास – ८ कोटी

  • राजमाता जिजाऊ उद्यान – ५ कोटी

  • छत्रपती संभाजी महाराज उद्यान – ३ कोटी

  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान – २ कोटी

विशेष म्हणजे, हे पैसे आता नगरपरिषदेकडे न जाता थेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) जाणार आहेत. म्हणजे फेसबुक पिंट्याच्या हातातून ‘चावी’च काढून घेतली!

सहा महिने कुंभकर्णासारखी झोप आणि आता ‘फेसबुक’वर जागी!

आता खरी गंमत इथेच आहे. ही १८ कोटींची कामे आज मंजूर झालेली नाहीत. ती सहा महिन्यांपूर्वीच मंजूर झाली होती. पण त्यावर ‘स्थगिती’ आणून ती फाईल कुजवत ठेवण्याचं पाप कोणी केलं? बरं, फेसबुक पिंट्या साहेब आणि त्यांचे ‘पाकीटमार’ पत्रकार आता जोरात पत्रकबाजी करत आहेत आणि या कामाचे श्रेय घेत आहेत.

पण धाराशिवची जनता एक साधा प्रश्न विचारत आहे:

“साहेब, तुम्ही तर आधीपासूनच सत्तेत होता! मग गेली सहा महिने तुम्ही काय ‘कुंभकर्णा’सारखे झोपला होता का? सहा महिन्यांत तुम्हाला या कामांची स्थगिती का उठवता आली नाही?”

सूर्यराजे सत्तेत येताच एका दिवसात ही स्थगिती उठली, हे ‘सूर्यप्रकाशाइतकं सत्य’ आहे! मग आता अचानक उठून “हे काम मीच केलं” अशा पोस्ट टाकून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेण्याचं हे फेसबुक पिंट्याचं कोणतं ‘स्वस्त’ राजकारण?

‘पिलावळ’ मैदानात, पण जनता हुशार!

सूर्यराजेंनी स्थगिती उठवताच फेसबुक पिंट्या आणि त्यांच्या मागेपुढे फिरणाऱ्या ‘पिलावळी’ची चांगलीच तारांबळ उडाली. सूर्यराजेंना या कामाचं श्रेय मिळू नये म्हणून त्यांनी तातडीने सोशल मीडियावर पोस्टचा रतीब सुरू केला.

पण सूर्यराजेंचे प्रधान आप्पानी  या पिलावळीचा आणि त्यांच्या साहेबांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. ते म्हणाले, “सहा महिने सत्तेत असूनही तुम्हाला धाराशिवसाठी एक साधं दर्जेदार उद्यान बांधता आलं नाही, आणि आता आम्ही तीन दिवसांत पैसे आणल्यावर तुम्ही टीका करता? हे अत्यंत हास्यास्पद आहे!”

४० वर्षे जिल्ह्याच्या विकासाचा कसा खेळखंडोबा झालाय, हे जनतेने पाहिलंय. फेसबुक पिंट्या आणि त्यांच्या आधीच्या नेत्यांच्या काळात धाराशिवला साधी चांगली बागही मिळाली नाही.

विकासकामांना आता ‘राजकारणाचा ब्रेक’ नको!

याआधीही पालकमंत्री आणि फेसबुक पिंट्या यांच्यातील ‘इगो’च्या लढाईत जिल्ह्याचे खूप नुकसान झाले आहे. फाईली धूळ खात पडल्या आणि जनता मात्र वाऱ्यावर राहिली.

आता सूर्यराजेंनी एक जबरदस्त ‘मास्टरस्ट्रोक’ मारला आहे. आता तरी फेसबुक पिंट्या यांनी एखाद्याचे ‘कान फुंकून’ पुन्हा या कामात अडथळे आणू नयेत. कारण श्रेय कुणीही घ्या, रिबीन कुणीही कापा, आणि फ्लेक्सवर कुणाचाही फोटो लावा (तशीही साहेबांना फोटो काढायची खूप हौस आहेच!)… पण आता ही कामे पूर्ण होऊ द्या!

तात्पर्य:

साहेब, फुकटचं श्रेय घेणं आणि फेसबुकवर लाईक्स मोजणं सोपं आहे, पण जनतेची कामे जमिनीवर उतरवण्यासाठी ‘विकासाचं व्हिजन’ लागतं, जे तुमच्याकडे नाही. सूर्यराजेंनी एका दिवसात जे करून दाखवलं, ते तुम्ही सहा महिन्यांत करू शकला नाहीत. त्यामुळे आता गप्प बसा आणि काम कसं होतंय ते पाहत राहा!

  • बोरूबहाद्दर 

Previous Post

विकासाच्या फाईलींना राजकारणाचा ब्रेक नको!

ताज्या बातम्या

फेसबुक पिंट्या सहा महिने झोपला होता का?

फेसबुक पिंट्या सहा महिने झोपला होता का?

June 23, 2026
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: “१० कोटी सोडा, माफीही मागणार नाही”

विकासाच्या फाईलींना राजकारणाचा ब्रेक नको!

June 23, 2026

अखेर स्थगिती उठली; ओमराजेंच्या कामाचा धडाका सुरू, पत्रकबाजांवर सोमनाथ गुरव यांचा हल्लाबोल

June 23, 2026
निष्ठेची मशाल विझवून सत्तेचा धनुष्यबाण हाती; ओमराजेंची नवी राजकीय परीक्षा !

कालच शिंदेसेनेत एन्ट्री, आज धाराशिवसाठी १८ कोटींची लॉटरी!

June 23, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात थरार! तरुणावर कोयत्याने सपासप वार, ‘गालिब नगर’च्या दोघांवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

June 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group