• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, June 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लोहाऱ्यात भावाच्या तक्रारीचा राग; पुण्याहून आलेल्या तरुणावर ब्लेडने हल्ला

admin by admin
May 9, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
0
SHARES
356
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा :  तुमच्या भावाने आमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका तरुणावर ब्लेड आणि लोखंडी नळीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना होळी (ता. लोहारा) येथे घडली. या हल्ल्यात पुण्याहून गावी आलेला तरुण गंभीर जखमी झाला असून, लोहारा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महादेव शिवाजी कांबळे (वय ३९, मूळ रा. होळी, सध्या रा. खराडी, पुणे) हे गावी आले असताना शुक्रवारी (ता. ८) सकाळी पावणेबाराच्या सुमारास अण्णाभाऊ साठे चौक परिसरात ही घटना घडली.

फिर्यादी महादेव कांबळे यांच्या भावाने आरोपींविरुद्ध यापूर्वी पोलिसांत तक्रार दिली होती. याचाच राग मनात धरून आरोपी मनोज राम पाटोळे, अभिजीत राम पाटोळे (दोघे रा. होळी) आणि अमर कांबळे (रा. कोल्हापूर) यांनी फिर्यादीला गाठले. “तुझ्या भावाने आमच्या विरोधात तक्रार का दिली?” असे म्हणत त्यांनी अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर आरोपींनी महादेव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी एका आरोपीने ब्लेडने वार केले, तर दुसऱ्याने लोखंडी नळीने डोक्यात व शरीरावर प्रहार करून गंभीर जखमी केले. परिसरात गोंधळ निर्माण झाल्यानंतर आरोपींनी “तुला जिवे ठार मारू” अशी धमकी देऊन तेथून पळ काढला.

या प्रकरणी जखमी महादेव कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात मनोज पाटोळे, अभिजीत पाटोळे आणि अमर कांबळे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


Previous Post

कळंबमध्ये जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; महिलेच्या डोक्यात तलवारीने वार

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; उमरग्यात व्यापाऱ्याचे सव्वा दोन लाख लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; उमरग्यात व्यापाऱ्याचे सव्वा दोन लाख लंपास

ताज्या बातम्या

‘सूर्यराजें’नी काढला ‘व्हिडिओ’ बॉम्ब! फेसबुक पिंट्या साहेब, आता तुम्ही पण एक ‘सेल्फी-व्हिडिओ’ काढा की!

‘सूर्यराजें’नी काढला ‘व्हिडिओ’ बॉम्ब! फेसबुक पिंट्या साहेब, आता तुम्ही पण एक ‘सेल्फी-व्हिडिओ’ काढा की!

June 24, 2026
फेसबुक पिंट्या सहा महिने झोपला होता का?

फेसबुक पिंट्या सहा महिने झोपला होता का?

June 23, 2026
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: “१० कोटी सोडा, माफीही मागणार नाही”

विकासाच्या फाईलींना राजकारणाचा ब्रेक नको!

June 23, 2026

अखेर स्थगिती उठली; ओमराजेंच्या कामाचा धडाका सुरू, पत्रकबाजांवर सोमनाथ गुरव यांचा हल्लाबोल

June 23, 2026
निष्ठेची मशाल विझवून सत्तेचा धनुष्यबाण हाती; ओमराजेंची नवी राजकीय परीक्षा !

कालच शिंदेसेनेत एन्ट्री, आज धाराशिवसाठी १८ कोटींची लॉटरी!

June 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group