ढोकी : आरोपी नामे-1)अजय उर्फ बबलु दत्ता इंगळे रा. साळेगाव, ता. केज जि. बीड, 2) संतोष दादाराव वाघमारे, रा. विडा ता. केज, 3) अकबर सालार शेख रा. आवाड शिरपुरा ता. कळंब, 4)शंकर बाळासाहेब चौधरी रा. पार्वतीनगर ता. परळी ह.मु. कारवेटवाडी ता. सोनपेठ यांनी दि. 07.02.2024 रोजी 22.00 ते दि. 08.02.2024 रोजी 03.30 ते 04.00 वा. सु. ढोकी कारखाना येथील वाहन तळाचे रोडचे कडेला मयत नामे- अमर राजेंद्र लोमटे, वय 27 वर्षे रा. कावळेवाडी, ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन त्यास शिवीगाळ करुन उसाने, लाकडी काठ्यांनी मारहान करुन व पाणी अंगावर टाकून ओले करुन जिवे मारण्याचे हेतूने मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्याच्यावर सरकारी दवाखाना येथे उपचार चालू असताना तो मयत झाला आहे. अशा मजकुराच्या मयताचे वडील फिर्यादी नामे- राजेंद्र सोपान लोमटे, वय 55 वर्षे, रा. कावळेवाडी, ता. जि. धाराशिव यांनी दि.10.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 302, 143, 147, 149, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आळणीत दोन गटात हाणामारी
धाराशिव :आरोपी नामे-1) विशाल वीर, 2) अजित वीर, 3) संकेत वीर तिघे रा. आळणी ता. जि. धाराशिव यांनी दि.10.02.2024 रोजी 12.00 वा. सु. आळणी गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर फिर्यादी नामे- प्रणव प्रदिप वीर, वय 29 वर्षे, रा. आळणी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मोटरसायकल अंगावर घालतो का असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, फायटर व तलवारीने जिवे ठार मरण्याच्या उद्देशाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व गळ्यातील चैन हिसकावून घेवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रणव वीर यांनी दि.10.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 307, 327, 323, 504,506, 34 भा.दं.वि.सं. सह आर्म ॲक्ट 4,25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे-1) प्रणव वीर, 2) प्रमोद वीर, 3) प्रविण वीर, 4) रामराजे साळुंके सर्व रा. आळणी ता. जि. धाराशिव यांनी दि.10.02.2024 रोजी 12.00 वा. सु. आळणी गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर फिर्यादी नामे- विशाल तात्यासाहेब वीर, वय 28वर्षे, रा. आळणी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु मागील भांडणात घराकडे का आला असे म्हाणत त्याचे ताब्यातील बुलेट मोटरसायकल अंगावर घालुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने चाकुने बगलेत वार करुन गंभीर जखमी केले. तुम्हाला गावात राहु देत नाही अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विशाल वीर यांनी दि.10.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 307, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.