• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांचे तळ्यात – मळ्यात

उमेदवारी दिली तरच भाजप मध्ये प्रवेश करणार

admin by admin
February 9, 2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील यांचे तळ्यात – मळ्यात
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघात जोरदार राजकीय मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. इंडिया आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांची उमेदवारी ‘फिक्स’ असली तरी महायुतीकडून रिंगणात कोण उतरणार ? याकडे लक्ष वेधले आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील धाराशिव-कळंब, तुळजापूर, उमरगा-लोहारा, भूम-परंडा या चार विधानसभा मतदारसंघाचा तसेच लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.तुळजापूर ( राणा जगजितसिंह पाटील ) , औसा ( अभिमन्यू पवार) आणि बार्शी ( राजेंद्र राऊत ) विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे , उमरगा-लोहारा ( ज्ञानराज चौगुले ) भूम-परंडा ( तानाजी सावंत ) या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत तर धाराशिव-कळंब ( कैलास पाटील ) विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. एकंदरीत रागरंग पाहता महायुतीचे पारडे सध्या जड आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेत फूट नव्हती. भाजप आणि शिवसेना मजबूत होती. राजकारणातून बाहेर पडलेले ओमराजे निंबाळकर यांना मोदी लाटेत खासदारकीची लॉटरी लागली. राष्ट्रवादीचे राणा जगजितसिंह पाटील यांचा दारुण प्रभाव झाला होता. लोकसभा निवडणुकीत पराभव होताच, राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि तुळजापूर विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट मिळवून, आमदार म्हणून निवडून आले होते.यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय चित्र बदलले आहे. शिवसेनेत उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीमध्ये दोन भाग झाले आहेत. महायुती म्हणून आ. राणा पाटील, तानाजी सावंत आणि ज्ञानराज चौगुले एकत्र आले आहेत.

धाराशिव लोकसभेची जागा शिवसेना ( शिंदे गट ) च्या वाट्याला गेल्यास पालकमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत किंवा माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) ला जागा सुटल्यास सुरेश बिराजदार यांना उमेदवारी मिळू शकते पण भाजपला जागा सुटल्यास कोणाला उमेदवारी मिळणार ? याबाबत प्रचंड औत्सुक्य आहे.

भाजपकडून आ. राणा पाटील हे लोकसभेसाठी फारसे इच्छुक नसले तरी पक्षाने आदेश दिल्यास त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे.आ. राणा पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील या लोकसभेसाठी इच्छूक असल्या तरी एकाच घरात पक्ष दोन तिकिटे देणार का ? हे एक कोडेच आहे. तसेच भाजपकडून तिकीट मिळावे यासाठी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, नितीन काळे, बसवराज मंगरुळे आदींनी देव पाण्यात ठेवले आहेत.

सध्या देशात अयोध्या श्रीराम मंदिरामुळे इंडिया आघाडीच्या उमेदवारांना ‘हे राम’ म्हणण्याची वेळ आली आहे. मोदीची गॅरंटी लोकांना पटल्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीच्या उमेदवाराचे पारडे जड राहणार आहे.बदललेली हवा पाहून शिवसेना ( उबाठा ) खासदार ओमराजे निंबाळकर हे लोकसभेसाठी फारसे इच्छूक नाहीत. धाराशिवची लोकसभेची जागा काँग्रेसला देऊन, स्वतः धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघात उभे राहण्याची त्यांची तयारी आहे. पण आ. कैलास पाटील यांनी शिवसेना फुटीच्या वेळी दाखवलेली निष्ठा ओमराजेंना आड येत आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना त्यांना लोकसभेसाठी उभे राहावे लागणार आहे.

बसवराज पाटील यांचे तळ्यात – मळ्यात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, माजी राज्यमंत्री , काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील दोन महिन्यापासून जिल्ह्यात पसरली आहे. काँग्रेसच्या अनेक बैठकीला मारलेली दांडी याला पृष्टि देत आहे. त्यांनी मुरुमजवळ उभा केलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सध्या अडचणीत असून, त्यांची कोंडी केली जात असल्याची चर्चा आहे.

या अडचणीतुन बाहेर पडण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, म्हणून दबाव वाढला आहे. परंतु उमेदवारी दिली तरच आपण भाजपमध्ये प्रवेश करू, अशी त्यांची अट आहे. ही अट भाजप पूर्ण करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात लिंगायत मतदार मोठ्या प्रमाणात आहे. तसेच शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात भाजपचे प्राबल्य वाढवण्यासाठी बसवराज पाटील यांची भाजपला गरज आहे. त्यामुळे भाजप बसवराज पाटील यांची अट मान्य करून, त्यांना उमेदवार म्हणून घोषित करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

Previous Post

धाराशिव, शिराढोण,लोहारा,आंबी येथे चोरी

Next Post

ढोकी : मोबाईल चोरीच्या आरोपावरून बेदम मारहाण केल्याने मजुराचा मृत्यू

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

ढोकी : मोबाईल चोरीच्या आरोपावरून बेदम मारहाण केल्याने मजुराचा मृत्यू

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026

Recent Posts

  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!