धाराशिव : फिर्यादी नामे- अनिता बाळु कटारे, वय 60 वर्षे, रा. देवळाली, ता. जि. धाराशिव या दि. 08.02.2024 रोजी 11.30 वा. सु. अनिता कटारे यांचे राहाते घरासमोर देवळाली येथे असताना आरोपी नामे- 1) कन्हैय्या क्रिश्मोहन यादव, 2) राजा राम बरण दोघे रा. लात्रा बागलपूर राज्य बिहार यांनी फिर्यादी व त्यांची चुलती देवई रानबा सपकाळ यांना चांदीचे जोडवे पॉलीश करुन देतो म्हणून घेवून चांदीचे जोडवे 6,500₹ व 2 ग्रॅम सोन्याचे मणीमंगळसुत्र असा एकुण 12,500₹ किंमतीचा माल चोरुन घेवून जात असताना फिर्यादी यांनी गावकऱ्यांच्या मदतीने पकडून धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले. यावर पोलीसांनी त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. यावर पोलीसांनी नमुद आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द धाराशिव ग्रामीण पो.ठा. येथे- गुन्हा क्र. 34/2024 भा.दं.वि. सं. कलम- 379, 34 अन्वये नोंदवण्यात आला आहे.
धाराशिव : दि. 08.02.2024 रोजी 02.00 ते 07.00 वा. सु. बस डेपो कार्यशाळा धाराशिव येथील अंदाजे 18,000₹ किंमतीची तनिजा टेक्नो कंपनीची वेल्डींग मशीन, 30 फुट वायर असा एकुण 21,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रणिता परमेश्वर भक्ते, वय 29 वर्षे, व्यवसाय- सहा.कार्यशाळा अधिक्षक एम.एस.आर.टी. सी. धाराशिव यांनी दि.08.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण : फिर्यादी नामे- प्रदीप काकासाहेब काळदाते, वय 34 वर्षे, रा. आवाडशिवरपुरा ता. कळंब जि. धाराशिव यांचे आवाडशिवरपुरा शिवारातील शेत गट नं 320 मधील विहरीतुन अंदाजे 18,500₹ किंमतीची एन्को कंपनीची मोटार 7.5 एच.पी.ची पणबुडी ही दि. 07.02.2024रोजी 11.30 ते दि.08.02.2024 रोजी सकाळी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रदीप काळदाते यांनी दि.08.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : फिर्यादी नामे- बलभिम दादाराव साळुंके, वय 75 वर्षे, रा. धनुरी ता. लोहारा जि. धाराशिव यांचे धानुरी शिवारातील शेत गट नं 86 मधील 2 एक्कर हरभरा पीक अंदाजे 40,000₹ किंमतीचे 10 क्विंटल हे फिर्यादीचे शेतात अतिक्रमण करुन आरोपी नामे- राजेंद्र भानुदास बाबर, 2) नरहरी राजेंद्र बाबर, 3) निळकंठ शाहुराज बाबर, 4)ज्ञानेश्वर निळकंठ बाबर सर्व रा. धानुरी ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 21.01.2024 रोजी 11.00 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बलभिम साळुंके यांनी दि.08.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 447, 379, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी : फिर्यादी नामे-अविनाश अरुण पाटील,वय 42 वर्षे, रा. डोंजा ता. परंडा जि. धाराशिव यांचे सीना नदी काठावर डोंजा शिवारातील शेतातुन अंदाजे 7,750₹ किंमतीचा 350 फुट वायर, मोटार स्टार्टर हे दि. 07.02.2024 रोजी 19.00 ते दि. 08.02.2024 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अविनाश पाटील यांनी दि.08.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.