• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, June 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग ‘हाशिम ऑईल’ तस्करी प्रकरण: ओडिशातून मुख्य सूत्रधाराला बेड्या

नक्षलग्रस्त भागात धाराशिव पोलिसांची धाडसी मोहीम; १० कोटींच्या अमली पदार्थ तस्करीचा छडा

admin by admin
May 10, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
नळदुर्ग ‘हाशिम ऑईल’ तस्करी प्रकरण: ओडिशातून मुख्य सूत्रधाराला बेड्या
0
SHARES
650
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : नळदुर्ग परिसरात पकडण्यात आलेल्या १० कोटी ३८ लाखांच्या ‘हाशिम ऑईल’ तस्करी प्रकरणाचा धागा शोधण्यात धाराशिव पोलिसांना मोठे यश आले आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार प्रसेनजित खिरमहन दास (वय ३३) याला ओडिसा राज्यातील अत्यंत दुर्गम आणि नक्षलग्रस्त पहाडी भागातून स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने धाडसी कारवाई करत अटक केली.

नेमकी घटना काय?

१९ एप्रिल २०२६ रोजी रात्री नळदुर्ग पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलिसांना पाहताच तस्कर कारमधून अंमली पदार्थांची बॅग फेकून पसार झाले होते. पोलिसांनी ही बॅग जप्त केली असता, त्यात १० कोटी ३८ लाख २० हजार रुपये किमतीचे ‘हाशिम ऑईल’ सापडले होते. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी या प्रकरणात नाशिक आणि मालेगाव येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.

असे सापडले धागेदोरे

पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान ओडिसातील प्रसेनजित दास हा मुख्य विक्रेता असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्याचे फक्त नावच माहित होते; तो कुठे राहतो, कसा दिसतो, याची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.

नक्षलग्रस्त भागात थरार

आरोपीचा शोध घेण्यासाठी ६ मे रोजी सपोनि सचिन खटके यांचे पथक ओडिसाला रवाना झाले. तपासाअंती आरोपी हा ओडिसातील ‘जनतापई’ या अत्यंत दुर्गम आणि नक्षल प्रभावित पहाडी क्षेत्रात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. अतिशय धोकादायक भाग असूनही, पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी दिलेल्या विशेष सूचनांनुसार पथकाने ८ मे रोजी सापळा रचला आणि प्रसेनजित दासला त्याच्या बालेकिल्ल्यातून शिताफीने ताब्यात घेतले.

ही आहे पथकाची कामगिरी

ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महेबुब अरब आणि रोहीत दंडनाईक यांच्या पथकाने फत्ते केली. आरोपीला पुढील कारवाईसाठी नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या रॅकेटचे आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.


Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट; उमरग्यात व्यापाऱ्याचे सव्वा दोन लाख लंपास

Next Post

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशी तालुक्यात रिन्यू पॉवरच्या 33 केव्ही लाईनची 400 मीटर केबल तोडली; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

June 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात शेतातील पाण्याच्या वादातून दाम्पत्याला बेदम मारहाण; लाकडी काठीच्या हल्ल्यात गंभीर जखमी

June 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंडा तालुक्यात बंद घराचे कुलूप तोडून पावणे दोन लाखांचे सोने आणि रोकड लंपास

June 24, 2026
बेंबळी: शेतात कामाला बोलावून महिलेवर अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल

धाराशिवमध्ये हॉटेलमध्ये थरार ! विवाहितेवर लैंगिक अत्याचार; पतीला चाकूचा धाक दाखवून मारहाण

June 24, 2026
‘सूर्यराजें’नी काढला ‘व्हिडिओ’ बॉम्ब! फेसबुक पिंट्या साहेब, आता तुम्ही पण एक ‘सेल्फी-व्हिडिओ’ काढा की!

‘सूर्यराजें’नी काढला ‘व्हिडिओ’ बॉम्ब! फेसबुक पिंट्या साहेब, आता तुम्ही पण एक ‘सेल्फी-व्हिडिओ’ काढा की!

June 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group