• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; एकाच दिवशी चोरीचे चार गुन्हे दाखल

कुंथलगिरी फाट्यावर बसमधून दोन लाखांचे दागिने पळवले; तर कोंडगावमध्ये सौर प्रकल्पातील तारांची चोरी

admin by admin
May 13, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, भुरट्या चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. मंगळवारी (ता. १२) एकाच दिवशी धाराशिव ग्रामीण, वाशी, भूम आणि आनंदनगर अशा चार वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यात एसटी बसमधील महिला प्रवाशाचे दोन लाखांचे दागिने, सौर ऊर्जा प्रकल्पातील तांब्याच्या तारा, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या सर्व प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे:

बसमधून २ लाख १० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

जालना ते सोलापूर या बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेचे २ लाख १० हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने पळवून नेले. ही घटना सोमवारी (ता. ११) सकाळी ११.१५ ते ११.३० च्या सुमारास कुंथलगिरी फाटा येथे घडली. सदर बस जेवणासाठी थांबली असता, फिर्यादी स्वाती विकास गवळी (वय ३८, रा. राम मंदिर शेजारी, मोहळ) या त्यांच्या आई व बहिणीसोबत वॉशरूमसाठी खाली उतरल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञाताने त्यांच्या बॅगमधील सोन्याचे दागिने लांबवले. याप्रकरणी मंगळवारी (ता. १२) वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सौर प्रकल्पातील ७० हजारांच्या तांब्याच्या तारा चोरीला

कोंडगाव (ता. धाराशिव) येथील महाजेनको व भेज कंपनी प्रा. लि. च्या सौर ऊर्जा प्रकल्पातून तब्बल ७० हजार रुपये किमतीची ३४ किलोमीटर लांबीची (४ स्क्वेअर मिमी) तांब्याची तार चोरीला गेली आहे. १४ ते १५ एप्रिल आणि २५ ते २६ एप्रिल या कालावधीत अज्ञात व्यक्तीने ‘आर आर १०’ या लोकेशनवरील ६ एसएमबी व ११ एसएमबी सौर पॅनेलला जोडलेली ही तार कापून नेली. या प्रकरणी सागर मोहन येलगुंटवार (वय ३७, रा. मोढा, ता. हिंगणा, जि. नागपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथरुड येथून घरासमोरील दुचाकीची चोरी

पाथरुड (ता. भूम) येथील अंबी रोड परिसरातून घरासमोर उभी केलेली १५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा एचएफ डिलक्स दुचाकी (क्र. एमएच २५ एएन ३३०३) चोरीला गेली आहे. सोमवारी (ता. ११) पहाटे ४ ते सकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ही दुचाकी पळवून नेली. याप्रकरणी शिवाजी उलन पवार (वय २४, रा. पाथरुड) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून भूम पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल घेऊन पोबारा

‘माझ्या बहिणीला फोन करून पैसे मागवायचे आहेत’, असे खोटे सांगून एकाने १५ हजार रुपये किमतीचा ‘विवो’ कंपनीचा मोबाईल घेऊन पोबारा केल्याची घटना २८ एप्रिल रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी काकासाहेब नारायण साळुंके (वय ४४, रा. राजुरी, ता. धाराशिव) यांनी मंगळवारी (ता. १२) आनंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून आरोपी नवनाथ शिंदे (रा. भवानी चौक, सांजा, ता. धाराशिव) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

केस मागे घेण्यासाठी वृद्धेला लोखंडी रॉडने मारहाण

Next Post

येवतीत ५४ हजारांचा अवैध गुटखा जप्त; किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

येवतीत ५४ हजारांचा अवैध गुटखा जप्त; किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!