ढोकी :आरोपी नामे-1)सचिन देवकते, 2) नवनाथ देवकते, 3) नागनाथ् देवकते, 4) माणिक देवकते, 5) मच्छींद्र देवकते, 6) अर्जुन देवकते, 7) भगवान देवकते,8) विमल देवकते, 9) पपीनी धायगुडे, 10) सचिन देवकते, 11) आशा देवकते सर्व रा. तेर पेठ ता. जि. धाराशिव यांनी दि. 10.02.2024 रोजी 21.40 वा. सु. तेर येथे फिर्यादी नामे- जनाबाई युवराज पडुळकर, वय 46 वर्षे, रा. तेर पेठ ता. जि. धाराशिव ह्या व त्यांचा मुलगा यांना नमुद आरोपींनी जुन्या भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीचे मुलास रस्त्यात आडवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, बॅट रॉडने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जनाबाई पडुळकर यांनी दि.11.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 341, 141, 143, 147, 149, 324, 323, 504,506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी :आरोपी नामे-1)समाधान ज्ञानोबा पडुळकर, 2) गजानन युवराज पडुळकर, 3) भगिरथ ज्ञानोबा पडुळकर, 4) जिवन मोहन पडुळकर, 5) ज्ञानोबा निवृत्ती पडुळकर, 6) शिवाजी अभिमान पडुळकर, 7) किरण युवराज पडुळकर, 8)पवन मोहन पडुळकर सर्व रा. तेर पेठ ता. जि. धाराशिव यांनी दि. 10.02.2024 रोजी 21.00 ते दि. 11.02.2024 रासेजी 11.00 वा. सु. तेर येथे फिर्यादी नामे- सरस्वती अर्जुन देवकते, वय 50 वर्षे, रा. तेर पेठ ता. जि. धाराशिव ह्या व त्यांची सुन व मुलगा यांना मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, बॅटने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सरस्वती देवकते यांनी दि.11.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504,506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळीत गुन्हा नोंद
बेंबळी :आरोपी नामे-1) तुकाराम गणपती जाधव, 2) जानका गणपती जाधव, 3) गणपती बाबुराव जाधव, 4) पुजा तुकाराम जाधव सर्व रा. समुद्रवाणी ता. जि. धाराशिव यांनी दि. 11.02.2024 रोजी 09.00 वा. सु. समुद्रवाणी येथे फिर्यादी नामे- अनिता संजय जाधव, वय 32 वर्षे, रा. समुद्रवाणी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शोष खड्डा खांदण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन दगड व काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अनिता जाधव यांनी दि.11.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 504,34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव :आरोपी नामे- किरण राउत रा. रामनगर सांजा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि. 11.02.2024 रोजी 16.00 वा. सु. रामनगर, सांजा रोड धाराशिव येथे फिर्यादी नामे- निता भानुदास सातपुते, वय 65 वर्षे, रा. रामनगर सांजा रोड ता. जि. धाराशिव यांना व त्यांचे पती यांना नमुद आरोपीने मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-निता सातपुते यांनी दि. 11.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.