• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, April 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पुण्यात एक सहायक निरीक्षक आणि दोन महिला पोलीस कर्मचारी निलंबित

तहान लागल्यावर प्यायला पाणी मागितले असता ‘मूत पी’ म्हणाला

admin by admin
February 15, 2024
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
पुण्यात एक सहायक निरीक्षक आणि दोन महिला पोलीस कर्मचारी निलंबित
0
SHARES
466
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

पुणे – चोरीच्या संशयावरून चौकशीसाठी पोलीस चौकीत आणलेल्या मोलकरीण महिलेला शिवीगाळ करीत बेदम मारहाण करणे पोलिसांना चांगलेच भोवले असून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक सहायक निरीक्षक आणि दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. घरकाम करणार्या महिलेला झालेल्या गंभीर मारहाणीच्या प्रकरणात थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच पुण्याचे नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला. फोनवरून याबाबत सविस्तर माहिती घेत संबधित पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याच कळतय. कसलाही पुरावा नसताना केवळ संशयावरून घरकाम करणार्या ह्या गरिब होतकरू महिलांच्या बाबतीत पोलिसांची ही पद्धत खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्ट सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

पुण्यात चोरीच्या संशयावरून घरकाम करणार्या महिलेला मारहाण आणि शिवीगाळ प्रकरण, देवाभाऊंच्या एका फोननंतर २४ तासांत संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांवर तातडीनं निलंबनाची कारवाई

ही कारवाई मंगळवारी (दि. १३) करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद दोरकर, मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलीस शिपाई उषा सोनकांबळे (मुख्यालय शिवाजीनगर) आणि पोलीस शिपाई वैशाली उदमले अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. (Pune Police News)

परिमंडळ पाचचे उपायुक्त आर. राजा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘‘तक्रारदार महिलेने पोलिसांवर मारहाणीचे आणि शिवीगाळ केल्याचे आरोप केले आहेत. हे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. या महिलेच्या अंगावर मारहाणीचे वळ होते. त्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करण्यास सांगण्यात आले होते. या वैद्यकीय तपासणी अहवालामध्ये या महिलेला इजा झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे एक सहायक निरीक्षक, दोन महिला पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे. या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैयक्तिक चौकशी निर्गमित करण्यात आली आहे. प्राथमिक कारवाई म्हणून निलंबन करण्यात आले आहे.’’

याबाबत तक्रारदार महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांनी कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेत तक्रार केली होती. ही महिला मोलकरीण म्हणून काम करते. ती ज्या घरात मोलकरीण म्हणून काम करते, त्या घरामध्ये दागिन्यांची चोरी झाली होती. या घरातील कुटुंबीयांनी तक्रारदार महिलेवर संशय व्यक्त केला होता. तिला घरामध्ये डांबून ठेवले होते. तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. पोलिसांनी तिला मगरपट्टा पोलीस चौकीत चौकशीसाठी आणले. त्यावेळी पोलिसांनी तिला बेदम मारहाण केली होती. तिला शिवीगाळ केली होती.

तहान लागल्यावर प्यायला पाणी मागितले असता ‘मूत पी’ असे म्हणत उपनिरीक्षकासह चार पोलिसांनी मिळून मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला होता. तिचे नातवाईक शोध घेत पोलीस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना पोलीस चौकीत पाठविण्यात आले. त्यावेळी महिलेला मारहाण सुरू होती. तिच्या पायावर आणि अंगावर मारहाणीचे वळ उठलेले होते. याबाबत नातेवाईकांनी पोलीस चौकीत जाऊन आरडाओरडा करीत पोलिसांना जाबदेखील विचारला होता. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने नातेवाईकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. यातच खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणार्या फडणवीसांकडूनच या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर २४ तासाच्या आतच संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

Previous Post

उस्मानाबाद जनता बँकेचे माजी अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी यांचे निधन

Next Post

धाराशिवमध्ये दोन तर ढोकीमध्ये चोरीचे दोन गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये दोन तर ढोकीमध्ये चोरीचे दोन गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

April 19, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

शेतातील आगीत अर्धा एकर ऊस अन् नारळाच्या झाडांसह दीड लाखांचे नुकसान; आवारपिंपरी येथील घटना, एकावर गुन्हा दाखल

April 19, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

टाकळीत यमाई देवी मंदिरात धाडसी चोरी; दीड किलोचा चांदीचा मुकुट अन् दागिन्यांसह १ लाख २१ हजारांचा ऐवज लंपास

April 19, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले; रोख रकमेसह ६० हजारांचे दागिने चोरीला

April 19, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

दारूच्या उधारीवरून ढोकीत तरुणावर कोयता, हंटरने जीवघेणा हल्ला; बार्शीतील दोघांवर गुन्हा दाखल

April 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group