• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘गुरू-शिष्यात’ रंगणार वर्चस्वाची लढाई!

 ५ अपक्षांसह दोघांचे बंड थंड;

admin by admin
June 5, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘गुरू-शिष्यात’ रंगणार वर्चस्वाची लढाई!
0
SHARES
447
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It
धाराशिव: धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचे चित्र अखेर गुरुवारी (४ जून ) दुपारी ३ वाजता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कमालीच्या नाट्यमय घडामोडींनंतर ५ अपक्ष उमेदवारांसह २ प्रमुख बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत ‘महायुती’ विरुद्ध ‘महाविकास आघाडी’ अशी थेट आणि चुरशीची लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीकडून भाजपचे उमेदवार माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख हे समोरासमोर ठाकले आहेत. एकेकाळी राजकीय ‘गुरू-शिष्य’ राहिलेल्या या दोन नेत्यांमध्येच आता मुख्य लढत होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

शेवटच्या १५ मिनिटांत नाट्यमय घडामोडी; बंडोबा थंड!

गेल्या काही दिवसांपासून ही निवडणूक प्रचंड चर्चेत राहिली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कळंबचे माजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा व धाराशिवचे नगरसेवक सचिन पवार यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केले होते. त्यांना शांत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सुरू असलेले प्रयत्न सुरुवातीला निष्फळ ठरताना दिसत होते. मात्र, अर्ज माघारीची वेळ संपायला अवघी १५ मिनिटे शिल्लक असताना, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यशस्वी मध्यस्थी केली. त्यांनी बंडखोरांची समजूत काढून त्यांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणले आणि अगदी शेवटच्या क्षणी हे बंड थंड करण्यात यश मिळवले. याशिवाय तुळजापूरच्या माजी नगराध्यक्ष अर्चना विनोद गगणे व मिलिंद महालिंगे यांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

या उमेदवारांनी घेतली माघार: मिलिंद महालिंगे, अर्चना गगणे, शरद यादव, अहमद राज सय्यद, संजय मुंदडा, सचिन पवार आणि सहाल बिन चारुस यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.

आखाड्यात ‘गुरू-शिष्या’ची जुगलबंदी

या निवडणुकीतील सर्वात रंजक बाब म्हणजे, महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही प्रमुख उमेदवार एकाच तालुक्यातील आहेत. माजी मंत्री बसवराज पाटील हे काँग्रेसचे दिग्गज नेते असताना महेश देशमुख हे त्यांचे अत्यंत विश्वासू व कट्टर कार्यकर्ते मानले जायचे. मात्र, आता बसवराज पाटील यांनी भाजपची वाट धरल्याने, एकेकाळचे हे राजकीय गुरू-शिष्य आता विधान परिषदेच्या आखाड्यात एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत.

चार टर्मनंतर धाराशिवला संधी

गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व इतर जिल्ह्यांतील नेत्यांना मिळत होते. यामध्ये माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी तीन वेळा तर सुरेश धस यांनी एकवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे यंदा कोणत्याही परिस्थितीत धाराशिव जिल्ह्यातीलच उमेदवारी मिळावी, अशी दोन्ही आघाड्यांमधील स्थानिक कार्यकर्त्यांची प्रबळ मागणी होती. तब्बल चार टर्मनंतर प्रमुख दोन्ही पक्षांनी धाराशिव जिल्ह्यातील नेत्यांनाच विधान परिषदेची संधी दिली आहे.

आकड्यांचा खेळ अन् धाराशिवचे महत्त्व

बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत. त्यामुळे सध्या धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील मतदारांची भूमिका विजयासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यातही धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक संस्थांवर महायुतीची एकहाती सत्ता आहे, तर दुसरीकडे लातूरमध्ये मनपा व औसा वगळता महायुतीची सरशी आहे. विजयासाठी लागणाऱ्या मॅजिक फिगरमध्ये धाराशिव जिल्ह्यातील मतदारांची भूमिकाच निर्णायक आणि खऱ्या अर्थाने ‘किंगमेकर’ ठरणार आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र! स्त्री रुग्णालयातून दुचाकी लंपास; कळंब बसस्थानकावर वृद्धेची सोन्याची साखळी चोरली, तर खेडमध्ये शेती साहित्य गायब

Next Post

धाराशिव शहर पोलीस स्टेशनमधील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याला वरिष्ठांचे अभय? चौकशी अहवालात दिरंगाई

Next Post
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

धाराशिव शहर पोलीस स्टेशनमधील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याला वरिष्ठांचे अभय? चौकशी अहवालात दिरंगाई

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!