• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहर पोलीस स्टेशनमधील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याला वरिष्ठांचे अभय? चौकशी अहवालात दिरंगाई

पोलीस ठाण्यातच 'बॉस' नावाचा केक कापून वाढदिवस साजरा

admin by admin
June 5, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : लाच घेतल्याप्रकरणी एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा भोगलेले धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विष्णू बेळये पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. जप्त केलेली दारू आणि वाहन प्रकरणात त्यांच्याविरुद्ध प्राथमिक अहवाल देऊनही वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. त्यांच्या चौकशी अहवालात त्रुटी असल्याचे कारण पुढे करून तो अहवाल दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून (RTI) समोर आली आहे.

एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) कार्यालयाकडे एका प्राथमिक चौकशी अहवालाची प्रत मागितली होती.  गणेश प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार, धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक (बक्कल नंबर १११७) विष्णू बेळये यांच्यावर प्राथमिक चौकशी करण्यात आली होती. शहर पोलीस निरीक्षकांनी या चौकशीचा अहवाल (जावक क्रमांक ६५५/२०२६, दि. २६/०१/२०२६) उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे सादर केला होता.

अहवाल ‘त्रुटीं’च्या नावाखाली प्रलंबित

या माहिती अधिकाराच्या अर्जावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने २७ मे २०२६ रोजी दिलेल्या लेखी उत्तरानुसार, शहर पोलिसांनी जो मूळ चौकशी अहवाल दिला होता, त्यामध्ये त्रुटी काढण्यात आल्या. उपविभागीय कार्यालयाने ११ मार्च २०२६ रोजी (जा.क्र. ११५३/२०२६) एक पत्र काढून या अर्जातील त्रुटींची पूर्तता करून अहवाल पुन्हा सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, अडीच महिन्यांचा कालावधी उलटूनही शहर पोलिसांनी सुधारित अहवाल अद्याप सादर केलेला नाही.

वादग्रस्त पार्श्वभूमी आणि वरिष्ठांचे ‘अभय’

मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू बेळये यांची पार्श्वभूमी आधीपासूनच वादग्रस्त राहिली आहे. यापूर्वी लाच घेतल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करत त्यांची एका वर्षाची वेतनवाढ रोखण्यात आली होती. तरीही त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा झालेली नाही. आता दुसऱ्या एका प्रकरणात जप्त केलेली दारू, त्या प्रकरणी गाडी सोडून देणे आणि जप्त केलेला माल कमी दाखवणे, अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस निरीक्षकांनी बेळये यांच्याविरुद्ध प्रथम अहवाल दिला होता. मात्र, असे गंभीर आरोप असतानाही वरिष्ठ अधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.

पोलीस ठाण्यातच कापला ‘बॉस’ लिहिलेला केक

पोलीस स्टेशनच्या आवारात स्वतःचा वाढदिवस साजरा करू नये, असा प्रशासनाचा स्पष्ट नियम आहे. मात्र, नियम धाब्यावर बसवून विष्णू बेळये यांचा वाढदिवस नुकताच पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, या वाढदिवसाच्या केकवर चक्क ‘बॉस’ (Boss) असे लिहिण्यात आले होते आणि तो केक थाटात कापण्यात आला.

एका बाजूला गंभीर प्रकरणांची चौकशी प्रलंबित ठेवली जाते आणि दुसऱ्या बाजूला असे प्रकार उघडपणे घडतात, यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विष्णू बेळये हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ करण्यात पटाईत असल्याची आणि त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची जोरदार चर्चा सध्या पोलीस वर्तुळात आणि शहरात सुरू आहे.

Previous Post

धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ‘गुरू-शिष्यात’ रंगणार वर्चस्वाची लढाई!

Next Post

तुळजापुरात पोलिसांचे ‘मेगा ऑपरेशन’! २ मटका अड्डे अन् २ ताडी केंद्रांवर एकाच वेळी छापे; १४ जणांना बेड्या, १३० लीटर ताडी नष्ट

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात पोलिसांचे 'मेगा ऑपरेशन'! २ मटका अड्डे अन् २ ताडी केंद्रांवर एकाच वेळी छापे; १४ जणांना बेड्या, १३० लीटर ताडी नष्ट

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?

September 5, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 5, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

September 4, 2026

Recent Posts

  • संपादकीय | अश्विनी पौळ प्रकरण : कुस्तीच्या आखाड्यात जिंकणारी महिला संसाराच्या आखाड्यात का हरली?
  • नळदुर्ग : अश्विनी पौळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
  • ‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!
  • नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!