• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, June 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

संपादकीय: कुलस्वामिनीच्या नगरीतील हे कसले ‘पोलीस राज’?

admin by admin
June 23, 2026
in सडेतोड
Reading Time: 1 min read
श्रेयासाठी ‘कल्ला’ करणाऱ्यांनो, शेतकऱ्यांच्या पराभवावर ‘मूक गिळून’ का बसलात?
0
SHARES
32
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

महाराष्ट्राची कुलस्वामिनी, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आई तुळजाभवानीच्या पावन नगरीला आज गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे ग्रहण लागले आहे. ज्या भूमीत लाखो भाविक श्रद्धेने नतमस्तक होतात, ती तुळजापूर नगरी आज मटका, गुटखा, चोऱ्या, दरोडे आणि लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायाने बदनाम होत आहे. अत्यंत क्लेशदायक बाब म्हणजे, हे आरोप कोणते विरोधक किंवा परके करत नसून, खुद्द तुळजापूरचे नगराध्यक्ष पिंटू उर्फ गंगणे आणि नगरसेविका प्रियंका गंगणे यांनी जाहीरपणे केले आहेत. तीन महिन्यांपूर्वीच त्यांनी यावर निवेदन दिले होते. परंतु, तुळजापूर पोलिसांची ‘खाबुगिरी’ सुटायला तयार नाही. गुटखा आणि मटका बहाद्दरांकडून कोण, किती वसुली करतो, याची इत्थंभूत आकडेवारीच आता समोर आली आहे. मग प्रश्न पडतो, तुळजापुरात कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करायचे की अवैध धंदेवाल्यांचे खिसे भरायचे, असा नवा नियम पोलिसांनी लागू केला आहे का?

या सगळ्या पापात भर घालत आहे ती येथील पोलीस प्रशासनाची दडपशाही! तुळजापूरमधील वाढत्या गुन्हेगारीविरुद्ध आणि अवैध धंद्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते पंकज शहाणे हे व्हिडिओच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवत होते, पीडितांचे अश्रू जगासमोर आणत होते. वास्तविक पाहता, पोलिसांनी या माहितीची दखल घेऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करायला हवी होती. परंतु, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी शहाणे यांनाच पोलीस ठाण्यात बोलावून दमबाजी केली, त्यांचा जाहीर अपमान केला. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील पोलिसांचा बाणा असूच शकत नाही.

विरोधाभास पाहा कसा आहे– ज्याच्यावर १७ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा नामचीन जुगार अड्डा चालवणाऱ्या गुंडाला मात्र हेच पोलीस निरीक्षक मांजरे ‘हाजी-हाजी’ करतात, त्याला पोलीस ठाण्यात सन्मानाने बसवतात आणि कोणाची तक्रार आली तर ती गुंडाला दाखवून तक्रारदारालाच धोक्यात आणतात! हा थेट गुन्हेगारांना दिलेला राजाश्रय नाही तर काय? खाकी वर्दीची ही कसली लाचारी?

या खाकी वर्दीच्या अरेरावीविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध अखेर तुळजापूरची जनता, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, राजकीय नेते आणि मानकरी पुजारी एकत्र आले आहेत. पंकज शहाणे यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि तुळजापूरला गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी गेल्या नऊ दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. संपूर्ण शहर रस्त्यावर उतरले आहे, रोज पोलीस प्रशासनाच्या नावाने शिमगा सुरू आहे. या आंदोलकांची मागणी अत्यंत रास्त आणि सरळ आहे– पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आणि पोलीस उपाधीक्षक निलेश देशमुख यांची तात्काळ हकालपट्टी (उचलबांगडी) झालीच पाहिजे!

परंतु, नऊ दिवस उलटूनही वरिष्ठ पोलीस अधिकारी ढिम्म आहेत. जनतेच्या या संतापाची दखल घेण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळ नाही. “वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गेंड्याची कातडी पांघरली आहे का?” असा संतप्त प्रश्न आज प्रत्येक तुळजापूरकर विचारत आहे. जर संपूर्ण शहर एका अधिकाऱ्याविरुद्ध बंड पुकारत असेल, तर वरिष्ठ अधिकारी कोणाला पाठीशी घालत आहेत?

पोलीस खाते हे जनतेच्या रक्षणासाठी असते, गुन्हेगारांच्या पोषणासाठी नाही. जर पोलीस निरीक्षक मांजरे आणि डीवायएसपी निलेश देशमुख यांना ‘जनाची नाही तर मनाची’ तरी लाज उरली असेल, तर त्यांनी स्वतःहून आपली बदली करून येथून चालते व्हावे. अन्यथा, तुळजापूरच्या जनतेचा हा संताप संपूर्ण जिल्ह्याला कवेत घेतल्याशिवाय राहणार नाही, हे गृहखात्याने आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच ओळखावे! तुळजाभवानीच्या नगरीत चालणारा हा पापी कारभार आता कदापि सहन केला जाणार नाही!

Previous Post

कालच एन्ट्री अन् आज पूर्ण जिल्हा बरखास्त! धाराशिवमध्ये ओमराजेंचा ‘सुसाट’ कारभार;

Next Post

ओमराजेंच्या प्रवेशानंतर शिंदे सेनेत मोठी खळबळ; जुनी कार्यकारिणी बरखास्त

Next Post
निष्ठेची मशाल विझवून सत्तेचा धनुष्यबाण हाती; ओमराजेंची नवी राजकीय परीक्षा !

ओमराजेंच्या प्रवेशानंतर शिंदे सेनेत मोठी खळबळ; जुनी कार्यकारिणी बरखास्त

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात थरार! तरुणावर कोयत्याने सपासप वार, ‘गालिब नगर’च्या दोघांवर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

June 23, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

शेती नांगरणीचा वाद पेटला! बोरी शिवारात १४ जणांच्या टोळीकडून पती-पत्नीला लाकडी दांड्याने बेदम मारहाण; उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

June 23, 2026
‘धूम’ स्टाईल चोरीचा पर्दाफाश! महामार्गावर धावत्या टेम्पोवर चढून ‘व्हिस्की’चे बॉक्स लांबवणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १.२३ लाखांचा माल जप्त

‘धूम’ स्टाईल चोरीचा पर्दाफाश! महामार्गावर धावत्या टेम्पोवर चढून ‘व्हिस्की’चे बॉक्स लांबवणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १.२३ लाखांचा माल जप्त

June 23, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

‘डिजिटल’ दरोडा! बनावट अ‍ॅपद्वारे जादा परताव्याचे आमिष दाखवून तुळजापूरच्या व्यक्तीला लुटले

June 23, 2026
ओमराजे निंबाळकर, तानाजी सावंत यांच्यावर शिंदे सेनेची धुरा; संघटना बळकट करण्यावर भर

ओमराजे निंबाळकर, तानाजी सावंत यांच्यावर शिंदे सेनेची धुरा; संघटना बळकट करण्यावर भर

June 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group