• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव शहरात २ अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची मोठी कारवाई!

१५ जुगारी जाळ्यात; रोख रक्कमेसह ५९ हजारांहून अधिकचा मुद्देमाल जप्त;

admin by admin
July 25, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम उघडली असून, शुक्रवारी (२४ जुलै २०२६) दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून ‘कल्याण मटका’ चालवणाऱ्या व खेळणाऱ्या एकूण १५ इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी मटक्याचे साहित्य, ३ मोबाईल आणि रोख रक्कमेसह हजारोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

१. पहिली कारवाई: सांजावेस गल्ली (देशपांडे स्टँडजवळ, तुळजापूर रोड)

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षकअमोल मोहिते साहेब व पोलीस निरीक्षक  कुमार दराडे  यांच्या पोलीस पथकाने २४ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास देशपांडे स्टँडजवळ, तुळजापूर रोडवरील ताज हॉटेलच्या समोर सांजा वेस गल्लीतील एका पत्राच्या शेडमध्ये धाड टाकली. तेथे जावेद शकील तांबोळी हा लोकांना बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळवताना रंगेहात पकडला गेला.

  • कारवाईतील आरोपी (१० जण):

    १) जावेद शकील तांबोळी (मुख्य आरोपी, रा. धाराशिव)

    २) सोहेल आयुक आत्तार (रा. धाराशिव)

    ३) मनोज अहमद शेख (रा. आंबेहोळ, ता. जि. धाराशिव)

    ४) दत्ता फुलचंद जाधव (रा. लामजन, ता. औसा, जि. लातूर)

    ५) बालाजी राजू शेळके (रा. धाराशिव)

    ६) दिलावर शमशोद्दीन भवरी (रा. धाराशिव)

    ७) राजू साहेबराव सरफाळे (रा. धाराशिव)

    ८) बालाजी मधुकर बोंदर (रा. धाराशिव)

    ९) अभिषेक बालाजी सूर्यवंशी (रा. धाराशिव)

    १०) नाना रामभाऊ ढोले (रा. धाराशिव).

  • जप्त मुद्देमाल: मटका चिट्ट्या, रोख रक्कम आणि ३ मोबाईल हँडसेट (ओप्पो, व्हीवो, जिओ भारत) असा एकूण ५९,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

२. दुसरी कारवाई: इंदिरा नगर (जे.के. पान टपरीच्या पाठीमागे)

दुसऱ्या कारवाईत पोलीस पथकाने सायंकाळी ५:१० वाजण्याच्या सुमारास इंदिरा नगर येथील जे. के. पानटपरीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत धाड टाकली. तेथे आरोपी जाकेर तांबोळी हा लोकांना कल्याण मटका खेळवून कमी पैशात जास्त पैशांचे आमिष दाखवत होता. पोलिसांना पाहताच तो जुगाराची वही टाकून पसार झाला, तर जुगार खेळणारे ४ इसम जागेवरच पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

  • कारवाईतील आरोपी (५ जण):

    १) जाकेर तांबोळी (अड्डा चालवणारा – फरार)

    २) रवी सुरेश मंजुळे

    ३) सौदागर नागनाथ बामणे

    ४) विकास साहेबराव राठोड

    ५) सचिन रमेश शितोळे (सर्व रा. धाराशिव).

  • जप्त मुद्देमाल: मटका जुगाराच्या सह्यांच्या चिठ्या, आकड्यांची पिवळी वही व रोख रक्कम असा एकूण १,६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

धाराशिव शहर पोलिसांत गुन्हे दाखल

या दोन्ही कारवाईंप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

सदरची धडक कामगिरी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक  सचिन पांडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते, पोलीस निरीक्षक कुमार दराडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन कन्हाळे (बकल नं. ३००), पोलीस अंमलदार कृष्ण गोपाळ गायकवाड (बकल नं. ६३६), योगेश साहेबराव कांबळे (बकल नं. ३२५), एस. बी. नाईकवाडी (बकल नं. २०४८), चालक पोलीस अंमलदार रनावरे (बकल नं. ४५६) व अमित वाघमारे (बकल नं. १८९८) यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Previous Post

धाराशिव सायबर पोलिसांची मोठी कामगिरी! ऑनलाईन फसवणुकीतील १९ लाखांची रक्कमेचा लागला छडा

Next Post

धाराशिव तालुक्यात धक्कादायक! उसतोडीच्या उचल रक्कमेवरून १६ वर्षांच्या मुलाचे अपहरण

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव तालुक्यात धक्कादायक! उसतोडीच्या उचल रक्कमेवरून १६ वर्षांच्या मुलाचे अपहरण

ताज्या बातम्या

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

September 18, 2026
एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

September 18, 2026
‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026

Recent Posts

  • पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR
  • एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
  • ‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!