• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

देशात सत्ता, राज्यात सत्ता… मग धाराशिवच्या भाजप भवनाला कोणाचं ग्रहण?

admin by admin
July 29, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

Version 1.0.0

0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: केंद्रात सलग तिसऱ्यांदा बहुमताची सत्ता, राज्यातही गेल्या १० वर्षांत बहुतांश काळ सत्तेची चाके हातात… तरीही धाराशिवमध्ये ‘जगात भारी’ असणाऱ्या भाजपला स्वतःच्या हक्काच्या भवनासाठी परक्याच्या तालावर नाचावं लागतंय, हीच खरी शोकांतिका आहे. काँग्रेसचे स्वतःचे आलिशान भवन शहरात दिमाखात उभे असताना, सत्ताधाऱ्यांच्या नशिबी मात्र ‘भाड्याचा थाट’ आणि परक्याच्या वास्तूचा आसरा आला आहे.

जागा स्वतःची, मग टाळा कोणाचा?

सांजा चौकात भाजपच्या स्वतःच्या नावे हक्काची जागा उपलब्ध आहे. तरीही “तिथे भवन उभारणीला नेमका कोणाचा खोडा आहे?” असा सवाल आता दबक्या आवाजात विचारला जात आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले नेते राणा जगजितसिंह पाटील यांच्या खाजगी इमारतीमधूनच सध्या भाजपचा कारभार हाकला जात आहे. त्यामुळे पक्षाचा कारभार चालतोय की नेत्याची खाजगी दुकानदारी? असा संतप्त सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

निष्ठावंतांची उघड-उघड मुस्कटदाबी!

वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन उन्हा-तान्हात राबणाऱ्या जुन्या आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांची या प्रकारामुळे मोठी घुसमट होत आहे. आयारामांच्या वळचणीला जाऊन बसलेल्या पक्ष कार्यालयामुळे निष्ठावंतांचा स्वाभिमान दुखावला गेला असून, त्यांची पद्धतशीरपणे मुस्कटदाबी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

“देशात सत्ता, राज्यात सत्ता… मग धाराशिवच्या भाजप भवनाला कोणाचं ग्रहण?” असा टोला आता सामान्य नागरिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते मारत आहेत. आता तरी पक्षाचे वरिष्ठ नेते यावर लक्ष देऊन स्वमालकीचे ‘भाजप भवन’ उभे करणार, की आयात केलेल्या नेत्यांच्या इमारतीतच पक्षाचा संसार थाटून राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरुच; ६ लाखांहून अधिक मुद्देमालाची लांबवालांबव, ५ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

Next Post

‘धाराशिव लाईव्ह’च्या बातमीचा दणका! भाजप भवनाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार

Next Post
‘धाराशिव लाईव्ह’च्या बातमीचा दणका! भाजप भवनाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार

'धाराशिव लाईव्ह'च्या बातमीचा दणका! भाजप भवनाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार

ताज्या बातम्या

धाराशिवमधील रस्त्यांसाठी १४० कोटींची फेरनिविदा; दिवाळीनंतर कामांना सुरुवात, पण निवडणुकीच्या आचारसंहितेचं काय?

पालकमंत्री की केवळ ‘झेंडा मंत्री’?

September 15, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026

Recent Posts

  • पालकमंत्री की केवळ ‘झेंडा मंत्री’?
  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!