• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भ्रष्टाचाराची गळती! ८ कोटींचे तुळजापूर बसस्थानक ठरले ‘पांढरा हत्ती’

 पहिल्याच पावसात प्रशासनाचे पितळ उघडे, कंट्रोलरच्या हातात छत्री; कारभाराचे हसे!

admin by admin
July 30, 2026
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
भ्रष्टाचाराची गळती! ८ कोटींचे तुळजापूर बसस्थानक ठरले ‘पांढरा हत्ती’
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, या गोंडस नावाखाली तब्बल आठ कोटी रुपये खर्चून उभारलेले अद्ययावत तुळजापूर बसस्थानक पहिल्याच पावसात साफ कोलमडले आहे. ८ कोटींचा निधी पाण्यात गेला असून, हे बसस्थानक म्हणजे केवळ भ्रष्टाचाराचे मॉडेल ठरल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

काही महिन्यांपूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात, कोट्यवधींच्या जाहिरातबाजीसह या बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसाने या भव्यतेचा फुगा फोडून एसटी महामंडळ आणि संबंधित कंत्राटदाराचा निकृष्ट कारभार चव्हाट्यावर आणला आहे.

कंट्रोलरच्या हातात छत्री; कारभाराचे हसे!

बसस्थानकातील सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या ‘कंट्रोल रूम’च्या छतातून पावसाच्या धारा लागल्याने, तेथील कर्मचाऱ्याला एका हातात छत्री धरून तर दुसऱ्या हातातून वाहतूक नियंत्रणाचे काम करावे लागत आहे. एसटी प्रशासनाच्या या लाजीरवाण्या आणि अक्षम्य भोंगळ कारभाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, संपूर्ण राज्यभरातून यावर तीव्र संताप आणि धिक्कार व्यक्त होत आहे.

भाविकांची ससेहोलपट; ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

लाखो भाविकांच्या आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी उभारलेल्या या इमारतीत ठिकठिकाणी पाणी साचले असून प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून केवळ उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार चालू देणाऱ्या संबंधित कंत्राटदाराची आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार की नेहमीप्रमाणे पांघरूण घालणार? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

राजकीय टोलेबाजीने वातावरण तापले

या गंभीर प्रकारानंतर राजकीय वर्तुळातूनही कडक शब्दांत टीका होत आहे. “तुळजापूरच्या आमदाराचे विकासाचे मॉडेल म्हणजे तुळजापूर बस स्टॅन्ड,” अशी जळजळीत आणि खरमरीत टिप्पणी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे पदाधिकारी सोमनाथ गुरव यांनी केली आहे.

जनतेच्या करातून गोळा झालेल्या ८ कोटी रुपयांची थेट धुळधाण करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून बसस्थानकाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

Previous Post

भूम नगरपालिकेच्या मुख्याधिकारी शैला डाके यांना नगरसेवकांपासून जीविताला धोका

Next Post

रामलिंग मंदिर परिसरात भाविकाला लुटले; मोबाईल व रोख रक्कम हिसकावली, चौघांविरुद्ध गुन्हा

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

रामलिंग मंदिर परिसरात भाविकाला लुटले; मोबाईल व रोख रक्कम हिसकावली, चौघांविरुद्ध गुन्हा

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026

Recent Posts

  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!