• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

आळणी प्रकरणाला नवे वळण; लहुजी शक्ती सेनेचा प्रति-मोर्चा, माजी सरपंच प्रमोद वीर यांच्याविरोधात गंभीर आरोप

admin by admin
August 1, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
आळणी प्रकरणाला नवे वळण; लहुजी शक्ती सेनेचा प्रति-मोर्चा, माजी सरपंच प्रमोद वीर यांच्याविरोधात गंभीर आरोप
0
SHARES
1.6k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : आळणी गावातील घटनांवरून सुरू झालेल्या वादाला शनिवारी नवे वळण मिळाले. लहुजी शक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी धाराशिव येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आळणीचे माजी सरपंच प्रमोद नेताजी वीर यांच्याविरोधात विविध गंभीर आरोप केले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात आरोप करण्यात आला की, आळणी ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीत अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित झाल्यानंतर मातंग समाजाला राजकीयदृष्ट्या मागे टाकण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात आले. समाजात जातीय तेढ निर्माण करून मातंग समाजाची बदनामी करण्यात येत असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला.

तसेच, संबंधित माजी सरपंच कथित अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत असून, “पिंजरा कला केंद्र” नावाने सुरू असलेल्या कथित व्यवसायामुळे अनेक युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, अनेक कुटुंबांमध्ये वाद निर्माण झाले, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी आणखी आरोप केला की, पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी शाळेतील विद्यार्थिनींचा वापर करण्यात आला. संबंधित विद्यार्थिनींना घटनेची माहिती नसतानाही त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला, तसेच शाळा प्रशासनाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय, मातंग समाजातील तरुणांना गुन्हेगार म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून, सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. काही समाजनेत्यांवर कारवाई करण्यासाठी एका प्रमुख लोकप्रतिनिधीकडून पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्यात आल्याचाही दावा निवेदनात करण्यात आला.

लहुजी शक्ती सेनेच्या शिष्टमंडळाने इशारा दिला की, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. अन्यथा मातंग समाजाच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल.

 

Previous Post

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची वणवण आणि सत्तेचा पोकळ आव!

Next Post

आळणीत जुन्या भांडणावरून रणकंदन! ८ जणांच्या टोळक्याचा कोयता, रॉड अन् दगडाने जीवघेणा हल्ला

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणीत जुन्या भांडणावरून रणकंदन! ८ जणांच्या टोळक्याचा कोयता, रॉड अन् दगडाने जीवघेणा हल्ला

ताज्या बातम्या

उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

उमरगा उपजिल्हा रुग्णालय प्रकरणाला नवे वळण; FIR, खुलासा आणि विलंबावर ऍड. शीतल चव्हाण यांचे गंभीर सवाल

August 1, 2026
येरमाळ्याच्या सुपुत्राचा जागतिक डंका; अमेरिकेत १८०९ एकर आधुनिक शेती, ४०० कोटींच्या कृषी संशोधन कंपनीचे नेतृत्व

येरमाळ्याच्या सुपुत्राचा जागतिक डंका; अमेरिकेत १८०९ एकर आधुनिक शेती, ४०० कोटींच्या कृषी संशोधन कंपनीचे नेतृत्व

August 1, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरुम पोलिसांची हायवेवर धडक कारवाई! कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ९ जनावरांची सुटका

August 1, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव शहरात खिरणीमळा येथे पोलिसांचा छापा! कत्तलीसाठी डांबलेल्या २ गोवंशीय गायींची सुटका

August 1, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्ग हद्दीत टेलरनगर येथे राडा! लाईट चालू-बंद करण्याच्या क्षुल्लक कारणावरून लोखंडी रॉड अन् कोयत्याने तुफान मारहाण

August 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!