• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पोलिसांच्या शेतात डोलतंय ‘गांजाचं’ पीक! पण एफआयआर मात्र ‘अज्ञात’ आत्म्यावर!

admin by admin
August 5, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
पोलिसांच्या शेतात डोलतंय ‘गांजाचं’ पीक! पण एफआयआर मात्र ‘अज्ञात’ आत्म्यावर!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: एरवी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बांधावर चुकून जरी गांजाचं एखादं रोपटं सापडलं, तर पोलीस थेट सिंघमच्या स्टाईलमध्ये एन्ट्री घेतात आणि त्याला थेट बेड्याच ठोकतात. पण, धाराशिवमध्ये सध्या कायद्याच्या रक्षकांनीच शेतीत एक वेगळाच ‘प्रयोग’ केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रयोगाची सध्या संपूर्ण जिल्ह्यात ‘झिंग झिंग झिंगाट’ चर्चा रंगली आहे.

नेमकं काय घडलंय?

धाराशिव शहरालगत असलेल्या जहागीरदार वाडी म्हणजे गड पाटीजवळ चार पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये अचानक ‘कृषीक्रांती’ करण्याची इच्छा जागृत झाली. त्यांनी मिळून एक शेत (प्लॉट) घेतलं. शेतात ज्वारी, बाजरी किंवा सोयाबीन येईल अशी सगळ्यांची अपेक्षा होती, पण तिथे चक्क एक भलं मोठं गांजाचं झाड डोलताना आढळून आलं! आता पोलिसांची शेती म्हटल्यावर पीक पण जरा ‘हाय लेव्हल’चं असणारच ना!

पण या ‘हाय’ झालेल्या वातावरणात भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कांबळे यांनी एंट्री घेतली आणि सगळा खेळच बिघडवला. त्यांनी थेट ग्रामीण पोलिसांना या ‘औषधी’ वनस्पतीची माहिती दिली.

आरोपी ‘अज्ञात’ इसम (म्हणजे भूत असावं!)

कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, हे शेत ( प्लॉट ) ग्रामीण पोलीस स्टेशनचेच कर्मचारी सुधाकर भांगे यांच्या नावावर आहे. आता मालक पोलीस, शेत पोलिसांचं, पण पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा कोणावर दाखल केला? तर म्हणे ‘अज्ञात इसमाविरुद्ध’! म्हणजे रात्रीतून एखादा अदृश्य माणूस आला, त्याने पोलिसांच्या शेतात खड्डा खणला, गांजाचं बी पेरलं, त्याला पाणी घातलं आणि तो झाड मोठं होईपर्यंत तिथेच वाढवून गायब झाला, असा पोलिसांचा दावा असावा.

तक्रारदारालाच धमक्यांचा ‘प्रसाद’

‘आमच्या शेतातलं झाड जगाला का दाखवलंस?’ या रागातून शेतमालक (म्हणजेच पोलीस कर्मचारी) भांगे हे आपल्याला धमक्या देत असल्याचा दावा विश्वनाथ कांबळे यांनी केला आहे. तशी तक्रार त्यांनी थेट जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. थोडक्यात सांगायचं तर, “चोरी तो चोरी, वरून सीनाजोरी!”

पीआय साहेबांचं ‘अचाट’ लॉजिक!

या संपूर्ण प्रकरणात सर्वात भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे ती ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी. ते म्हणतात, “पोलिसाला जर गांजाच लावायचा होता, तर एक झाड कशाला लावलं असतं? भरपूर झाडं लावली असती ना! आमचा तपास सुरू आहे…”

वा रे वा! म्हणजे पोलिसांना जर एखादा ‘धंदा’ करायचाच असेल तर तो रिटेलमध्ये नाही, थेट होलसेलमध्येच करतील, असा पीआय साहेबांचा ठाम विश्वास दिसतोय! साहेबांच्या या लॉजिकला तोड नाही.

तात्पर्य:

कायदा सर्वांसाठी समान असतो, पण काही लोकांसाठी तो जरा जास्तच ‘समान’ असतो. सामान्य शेतकरी असता तर आतापर्यंत आतमध्ये सडत असता, पण इथे खाकी वर्दीतले शेतकरी असल्यामुळे सध्या फक्त ‘तपास’ (आणि गांजाचं झाड) जोमात सुरू आहे!

ताजा कलम: आता या अज्ञात इसमाला शोधण्यासाठी पोलीस कोणत्या ‘बाबाची’ मदत घेतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे!

Previous Post

धाराशिव तालुक्यात बालविवाहातून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार!

Next Post

कळंब शहरात जमिनीच्या वादातून पुण्याच्या टोळक्यासह ९ जणांचा धुमाकूळ!

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब शहरात जमिनीच्या वादातून पुण्याच्या टोळक्यासह ९ जणांचा धुमाकूळ!

ताज्या बातम्या

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026

Recent Posts

  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!