• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, August 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“साहेब, यंदा झाडे लावण्याआधी हे सांगा, गेल्या वर्षीची किती जगली?”

धाराशिवच्या नेटकऱ्यांनी काढली प्रशासनाची 'डिजिटल' पिसे!

admin by admin
August 12, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 2 mins read
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जनता दरबार’ सुरू, नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : सोशल मीडिया हा फक्त स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी किंवा प्रचारासाठी नसतो, तर इथली पब्लिक कधीही तुमचं ‘डिजिटल ऑडिट’ करू शकते, याचा चांगलाच प्रत्यय धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना आला आहे. निमित्त होतं, यंदाच्या वृक्षारोपण मोहिमेचं!

नेमका प्रकार काय?

जिल्हाधिकारी पुजार यांनी प्रशासनाच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला. यात त्यांनी नागरिकांना यंदाच्या वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. प्रशासनाला वाटलं, व्हिडिओला भरपूर लाईक्स आणि ‘ग्रेट वर्क सर’ अशा कमेंट्स येतील. पण घडलं भलतंच! धाराशिवच्या जागरूक नेटकऱ्यांनी थेट प्रश्नांच्या फैरी झाडत प्रशासनाला घाम फोडला.

“साहेब, यंदा झाडे लावण्याचं आवाहन ठीक आहे, पण आधी हे सांगा की गेल्या वर्षी लावलेली किती झाडे जिवंत आहेत?” असा थेट सवाल कमेंट बॉक्समध्ये विचारून नेटकऱ्यांनी प्रशासनाचा ‘सॉफ्टवेअर अपडेट’ केला. यावरून हे स्पष्ट झालंय की, धाराशिवच्या जनतेचं प्रशासनाच्या कामावर अगदी बारकाईने लक्ष आहे.

खड्डे तेच, झाडे मात्र नवी! (पारा गावचा अजब कारभार)

नेटकऱ्यांचा संताप काही उगाच नाहीये. प्रशासनाकडून वृक्षारोपणावर अफाट खर्च केला जातो, पण झाडे जगवण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होतं ही वस्तुस्थिती आहे.

  • वाशी तालुक्यातील ‘पारा’ गावात गेल्या वर्षी तब्बल ३,७०० झाडे लावण्यात आली होती.
  • आता धक्कादायक बाब म्हणजे, यंदाही नेमक्या त्याच खड्ड्यांमध्ये पुन्हा नवीन झाडे लावली जाणार आहेत!
  •  ‘खड्डे तेच आणि झाडे नवी’ या प्रशासनाच्या अजब कारभाराचे वाभाडे आता निघत आहेत.

सोशल मीडियावर नुसती हवा करण्यापेक्षा, वास्तवात झाडे जगवा,” असाच खणखणीत मेसेज धाराशिवकर या निमित्ताने देत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचा दावा विरुद्ध नेटकऱ्यांचा सवाल

एकीकडे इन्स्टाग्रामवर जनतेच्या प्रश्नांचा पाऊस पडत असतानाच, जिल्हाधिकाऱ्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत वृक्ष लागवड मोहिमेबद्दल बोलताना एक मोठा दावा केला. “गेल्या वर्षी लावलेली ७० टक्के झाडे जिवंत आहेत,” असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं.

आता लक्ष उत्तराकडे!

जिल्हाधिकारी साहेबांनी पत्रकार परिषदेत कागदावरचा ७० टक्क्यांचा आकडा तर सांगितला, पण सोशल मीडियावर कमेंट्सच्या माध्यमातून जनतेने जो आरसा दाखवलाय, त्याचं काय? नेटकऱ्यांच्या या थेट आणि टोकदार प्रश्नांना प्रशासन खरंच उत्तर देणार का? की ‘पुढचं पाठ आणि मागचं सपाट’ या म्हणीप्रमाणे यंदाही फक्त जुनेच खड्डे नव्या झाडांनी भरण्याचं काम होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by District Collector & Magistrate – Dharashiv (@district_collector_dharashiv)

Previous Post

‘बंगल्या’वरून उडाला भडका अन् प्रवक्त्याने काढली ‘चार पक्ष’ बदलणाऱ्यांची राजकीय कुंडली!

Next Post

ड्रग्ज कनेक्शन भोवले! अटकेत असलेल्या नगरसेवक मोहसीन मिर्झाची ठाकरे गटातून हकालपट्टी

Next Post
ड्रग्ज कनेक्शन भोवले! अटकेत असलेल्या नगरसेवक मोहसीन मिर्झाची ठाकरे गटातून हकालपट्टी

ड्रग्ज कनेक्शन भोवले! अटकेत असलेल्या नगरसेवक मोहसीन मिर्झाची ठाकरे गटातून हकालपट्टी

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू;

धाराशिवमध्ये ‘यमदूत’ बनून फिरताहेत अवैध वाहने

August 13, 2026
धाराशिवमध्ये भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू;

धाराशिव अपघात प्रकरणात धक्कादायक वळण: मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या टिप्परचा PUC, टॅक्स आणि परमिटही गायब!

August 13, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

‘काँग्रेस-राष्ट्रवादी युक्त’ भाजप, साहेबांच्या मंत्रीपदाची हुलकावणी अन् दत्ताभाऊंची ‘सँडविच’ अवस्था!

August 13, 2026
धाराशिवमध्ये भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू;

धाराशिवमध्ये भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू;

August 13, 2026
ड्रग्ज कनेक्शन भोवले! अटकेत असलेल्या नगरसेवक मोहसीन मिर्झाची ठाकरे गटातून हकालपट्टी

ड्रग्ज कनेक्शन भोवले! अटकेत असलेल्या नगरसेवक मोहसीन मिर्झाची ठाकरे गटातून हकालपट्टी

August 12, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये ‘यमदूत’ बनून फिरताहेत अवैध वाहने
  • धाराशिव अपघात प्रकरणात धक्कादायक वळण: मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या टिप्परचा PUC, टॅक्स आणि परमिटही गायब!
  • ‘काँग्रेस-राष्ट्रवादी युक्त’ भाजप, साहेबांच्या मंत्रीपदाची हुलकावणी अन् दत्ताभाऊंची ‘सँडविच’ अवस्था!
  • धाराशिवमध्ये भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू;
  • ड्रग्ज कनेक्शन भोवले! अटकेत असलेल्या नगरसेवक मोहसीन मिर्झाची ठाकरे गटातून हकालपट्टी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!