• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चिखलीत वर्गणीच्या १,५०० रुपयांवरून पाच जणांचा हल्ला; गॅरेजची तोडफोड

admin by admin
August 14, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : वर्गणीच्या १ हजार ५०० रुपयांच्या हिशोबावरून झालेल्या वादातून पाच जणांनी दोन भावांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण केल्याची घटना चिखली येथे १० ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी गॅरेजची तोडफोड करून नुकसान केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नेताजी दाणे (वय ३२, रा. चिखली, ता. जि. धाराशिव) आणि त्यांचा चुलत भाऊ महादेव तानाजी दाणे यांच्यासोबत हा प्रकार घडला.

आकाश महादेव पोंदे, समाधान तानाजी दाणे, गणेश महादेव लोकरे, सचिन महादेव पोंदे आणि महादेव एकनाथ पोंदे, सर्व रा. चिखली, हे १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन आले. बाळू मामाच्या वर्गणीतील १ हजार ५०० रुपयांचा हिशोब मागण्याच्या कारणावरून त्यांनी महादेव दाणे यांच्याशी वाद घातला.

यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, लोखंडी रॉड आणि काठीने संदीप दाणे व महादेव दाणे यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच गॅरेजची तोडफोड करून नुकसान केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी संदीप दाणे यांनी १३ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३(५), ३२४(४) व १२६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बेंबळी पोलीस करीत आहेत.

Previous Post

कळंबमध्ये मोटरसायकलचा कट मारल्याच्या कारणावरून तरुणावर कोयत्याने हल्ला; जीवे मारण्याची धमकी

Next Post

भूम-वाशी पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन पिकअपमधून 16.58 लाखांचा गुटखा जप्त

Next Post
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

भूम-वाशी पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन पिकअपमधून 16.58 लाखांचा गुटखा जप्त

ताज्या बातम्या

एकट्याने शेती नाही, आता गटानेच प्रगती; कसगीच्या रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटाची यशस्वी वाटचाल

एकट्याने शेती नाही, आता गटानेच प्रगती; कसगीच्या रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटाची यशस्वी वाटचाल

August 14, 2026
तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेवरून सरनाईक-पाटील आमनेसामने; ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोप

तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेवरून सरनाईक-पाटील आमनेसामने; ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोप

August 14, 2026
धाराशिव: मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९ जणांवर गुन्हा दाखल, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

गुळहल्ली शिवारात जुगार अड्ड्यावर छापा; 87 हजार 600 रुपये जप्त

August 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

रहदारीस धोकादायकरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर गुन्हे; जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांची कारवाई

August 14, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

भूम-वाशी पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन पिकअपमधून 16.58 लाखांचा गुटखा जप्त

August 14, 2026

Recent Posts

  • एकट्याने शेती नाही, आता गटानेच प्रगती; कसगीच्या रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटाची यशस्वी वाटचाल
  • तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेवरून सरनाईक-पाटील आमनेसामने; ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोप
  • गुळहल्ली शिवारात जुगार अड्ड्यावर छापा; 87 हजार 600 रुपये जप्त
  • रहदारीस धोकादायकरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर गुन्हे; जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांची कारवाई
  • भूम-वाशी पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन पिकअपमधून 16.58 लाखांचा गुटखा जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!