• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘ऑपरेशन लोटस’ फुस्स, आता ‘ऑपरेशन टायगर’ची डरकाळी! आलिशान गाडीत राडा अन् मल्हार पाटलांचा संताप!

धाराशिव 'कुरुक्षेत्र' नवा अंक: 16

admin by admin
August 26, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
भाजपच्या राड्यानंतर आता शिंदे गटात ‘बॉम्ब’ फुटणार; धाराशिवचं नवं पॉवर-प्ले: शिंदे गटात ‘जुने विरुद्ध नवे’ संघर्ष अटळ!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिवच्या राजकारणात सध्या जो ‘सस्पेन्स आणि थ्रिलर’ सुरू आहे, त्यापुढे बॉलिवूडचे पिक्चरही फिके पडतील! साहेबांच्या (राणा पाटील) आणि भावी खासदारांच्या (मल्हार पाटील) ‘ऑपरेशन लोटस’चा फुगा पुण्याच्या अलीकडेच असा काही फुटलाय, की आता कमळाच्या पाकळ्या गोळा करण्याची वेळ आली आहे. आणि इकडे ‘कमळ’ कोमेजले असतानाच, तिकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ने थेट ठाण्यातून डरकाळी फोडली आहे!

पुण्याच्या अलीकडचा तो ‘राडा’ अन् गाडीचा यू-टर्न!

झाले असे की, धाराशिव नगरपालिकेतील ठाकरे गटाचे ७ पैकी ४ नगरसेवक भाजपच्या गळाला लागले होते (पाचवा नंतर मागून जाणार होता). या ‘ऑपरेशन लोटस’साठी साहेब आणि मल्हार पाटलांचा अतिशय गुप्त आणि तगडी फिल्डिंग लावली होती. या नगरसेवकांना मुंबईला नेण्यासाठी थेट भाजपचे उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांची ‘आलिशान गाडी’ दिमतीला देण्यात आली.

गाडी सुसाट वेगाने मुंबईच्या दिशेने निघाली. पण पुण्याच्या अलीकडे एका हॉटेलवर गाडी थांबली आणि पिक्चरमध्ये अचानक भयंकर ट्विस्ट आला! हॉटेलवर या नगरसेवकांमध्ये अचानक कोणत्यातरी कारणावरून (कदाचित ‘खोक्यांच्या’ वाटणीवरून?) जोरदार हमरीतुमरी आणि राडा सुरू झाला.

इकडे यांचा राडा सुरू असतानाच, मागून पाळतीवर असलेल्या ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट हॉटेलवर ‘धाड’ टाकली! त्यांनी या नगरसेवकांना अक्षरशः उचलले, गाडीत कोंबले आणि मुंबईचा रस्ता सोडून थेट धाराशिवला परत आणले! अक्षय ढोबळेंची आलिशान गाडी आणि साहेबांचे ‘ऑपरेशन लोटस’ पुण्यातूनच ‘बॅक टू पॅव्हेलियन’ झाले!

‘भावी खासदारां’चा पारा सटकला; ठेकेदाराची काढली पिसे!

पुण्यातून नगरसेवक ‘हायजॅक’ झाल्याची बातमी जेव्हा धाराशिवला पोहोचली, तेव्हा ‘भावी खासदार’ मल्हार पाटील यांचा संतापाने अक्षरशः भडका उडाला!

आपल्याच उपनगराध्यक्षाच्या गाडीतून नगरसेवक पळवले जातात, हे त्यांच्या जिव्हारी लागले. ज्या ‘मॅनेजरवर’ (नेत्यावर) या नगरसेवकांना सुखरूप मुंबईला पोहोचवण्याची जबाबदारी सोपवली होती, त्याला मल्हार पाटलांचा फोनवरूनच इतके भयंकर ‘हासडले’ की विचारू नका! “एवढं एक काम धड करता येत नाही का?” अशा शब्दांत झाप-झाप झापल्याची आणि त्या नेत्याची पार पिसे काढल्याची चर्चा आता संपूर्ण धाराशिवमध्ये चवीने चघळली जात आहे.

कमळ कोमेजले… आता ‘ऑपरेशन टायगर’ची डरकाळी!

इकडे साहेबांचे ‘ऑपरेशन लोटस’ फसल्याची संधी साधत, तिकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली ‘ऑपरेशन टायगर’ची फिल्डिंग टाईट केली. ओमराजेंनी असा काही फासा टाकला की, जे नगरसेवक भाजपमध्ये जाणार होते, त्यांचे थेट ‘ब्रेनवॉश’ करून त्यांना शिंदे गटाच्या वाटेवर आणून ठेवले!

खात्रीलायक वृत्तानुसार, आता ठाकरे गटाचे एकूण ५ नगरसेवक (जे कालपर्यंत भाजपच्या वाटेवर होते) ते आता थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत!

४ नगरसेवक ठाण्यात दाखल; फत्ते होणार का?

सर्वात मोठी ब्रेकिंग म्हणजे, या पाचपैकी ४ नगरसेवक अत्यंत गुप्तपणे ‘ठाणे’ शहरात सुरक्षित दाखल झाले आहेत. (यावेळी त्यांना पुण्यात हॉटेलवर थांबण्याची चूक केली नाहीये!) उर्वरित एक जण लवकरच मागून जॉईन होणार आहे. हे सर्वजण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची पक्की खबर आहे.

आता संपूर्ण धाराशिवकरांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागले आहे— साहेबांचे ‘ऑपरेशन लोटस’ तर फोल ठरले, पण आता ओमराजेंचे हे ‘ऑपरेशन टायगर’ खरंच फत्ते होणार का? की ठाण्यातही एखादा नवा ‘डॉन’ एन्ट्री मारून नवा राडा करणार? धाराशिवच्या या राजकीय महाभारताचा पुढचा अंक अतिशय थरारक असणार आहे!

Previous Post

ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!

Next Post

धाराशिवमध्ये ‘घोडेबाजार’वर तानाजी जाधवरांचा घणाघात; ‘नगरसेवक पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या’

Next Post
वर्षात फक्त ‘स्थगिती’ दिसली, ‘प्रगती’ नाही! : तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

धाराशिवमध्ये ‘घोडेबाजार’वर तानाजी जाधवरांचा घणाघात; ‘नगरसेवक पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या’

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026
उमरगा पोलिसांची मोठी कारवाई : इनोव्हा कारमधून बेकायदेशीर गुटख्याची आंतरराज्य तस्करी उघड

उमरगा पोलिसांची मोठी कारवाई : इनोव्हा कारमधून बेकायदेशीर गुटख्याची आंतरराज्य तस्करी उघड

October 17, 2026

Recent Posts

  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
  • उमरगा पोलिसांची मोठी कारवाई : इनोव्हा कारमधून बेकायदेशीर गुटख्याची आंतरराज्य तस्करी उघड
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!